अपघातात ११ प्रवासी जखमी

By admin | Published: January 13, 2017 02:25 AM2017-01-13T02:25:06+5:302017-01-13T02:25:06+5:30

प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक गाडीस टँकरची समोरासमोर जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात

11 passengers were injured in the accident | अपघातात ११ प्रवासी जखमी

अपघातात ११ प्रवासी जखमी

Next

तळेगाव दाभाडे : प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक गाडीस टँकरची समोरासमोर जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात मॅजिकमधील अकरा प्रवासी जखमी झाले. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तळेगाव- चाकण राज्यमार्गावर सुदवडी (ता.मावळ) गावच्या हद्दीमध्ये कृष्णा रोझेस नर्सरीसमोर झाला.
पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी विलास कोंडिबा डफळ (वय ३६ , रा. मु. पो. धामारी, ता.शिरपूर, जि. पुणे) या टँकर चालकास अटक केली आहे.
अपघातासंदर्भात महादेव रामकिशन शहाणे (वय ३० , रा. खालुंब्रे ता. खेड) या प्रवाशाने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. अपघातात मॅजिक चालकासह ११ प्रवासी जखमी झाले आहेत. यात मॅजिक चालक पांडुरंग किसन भोईवर ( वय २८, रा. जोशी वाडा, तळेगाव दाभाडे) यांच्यासह तीन गंभीर जखमींचा समावेश आहे. जखमींना खालुंब्रे, तळेगाव दाभाडे व सोमाटणे फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महादेव रामकिशन शहाणे (वय ३०), योगिता माधव शहाणे (वय ३०), झरिना इलियाज खान (वय ३०), सलमान इलियाज खान (वय २१, रा. खालुंब्रे ), अनिल पांडुरंग हिरवाले (वय २६ , रा. म्हाळुंगे ता. खेड, ), सुमित सुरेश वानखेडे (वय २०, रा. खालुंब्रे ता. खेड), श्रीकांत बाबूलाल नायक ( वय २४ , रा. खालुंब्रे ता. खेड), मिराबाई ढोकळे (वय ५० , रा. सावरदरी, ता. खेड), ताराबाई पांडुरंग लेंडघर (वय ६५ , रा. रानबाईमळा, खराबवाडी , चाकण ता. खेड, ), संतोष मुसा लेंका ( वय २० रा. खालुंब्रे ), पांडुरंग किसन भोईवर (वय.२८ , जोशीवाडा ,तळेगाव दाभाडे) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाणे हे मॅजिक गाडीमधून (क्र. एमएच २५ बी ९६८ ) तळेगावला जात असताना भरधाव वेगाने टँकर चालवीत मॅजिक गाडीला धडक दिली.

Web Title: 11 passengers were injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.