उरुळी कांचनमध्ये दोन ट्रकच्या अपघातात ११ जखमी; अवैध प्रवासी, वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:50 PM2018-02-21T18:50:14+5:302018-02-21T18:55:57+5:30

मंगळवारी पहाटे उरुळी कांचननजीक झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात ११ जण जखमींपैकी ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताने अवैध प्रवासी वाहतुकीचा व अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

11 people injured in two truck accident in Uruli Kanchan; Illegal traveler, sand transport issue of on the anvil | उरुळी कांचनमध्ये दोन ट्रकच्या अपघातात ११ जखमी; अवैध प्रवासी, वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर

उरुळी कांचनमध्ये दोन ट्रकच्या अपघातात ११ जखमी; अवैध प्रवासी, वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर

googlenewsNext
ठळक मुद्देअपघातात टायर वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील एकूण ११ जण जखमीअपघातानंतर वाळू वाहतूक करणारा ट्रकचालक गाडीसह फरार

उरुळी कांचन : मंगळवारी पहाटे उरुळी कांचननजीक झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात ११ जण जखमींपैकी ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताने अवैध प्रवासी वाहतुकीचा व अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याला आळा घालण्यासाठी सरकार दरबारी काहीच ठोस पावले उचलली जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा बळी यात जातोय हे वास्तव पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या हद्दीत खेडेकरमळा येथे टायर वाहतूक करणारा ट्रक व वाळूचा ट्रक यांच्यात मंगळवारी (ता. २०) पहाटे झालेल्या अपघातात टायर वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील एकूण ११ जण जखमी झाले. जखमींपैकी चालक, क्लीनर यांच्यासह दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर वाळू वाहतूक करणारा ट्रकचालक गाडीसह फरार झाला आहे.  जखमींमध्ये आरुबाई राजू मखरे (वय  ३), रुहीबाई राजू मखरे (वय २), प्रतिभा राजू मखरे (वय  ३०), पार्वती बाबूराव गायकवाड (चौघे रा. राजवाडा, ता. इंदापूर), पिराजी लक्ष्मण मिसाळ (वय ४०), स्वाती भागवत मिसाळ (वय  २८), हरिवंदा प्रवीण गायकवाड (वय ५०), सुमन चंद्रगुप्त गायकवाड (वय २८), संजयकुमार रामचंद्र रगारे (वय ४५, पाचही रा. बसवकल्याण, ता. हाळी, कर्नाटक), चालक आशिफ शेख (वय २६) क्लीनर महंमद युसुफ (वय २४, दोघेही रा. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) यांचा समावेश आहे. जखमींपैकी चालक आशिफ शेख, क्लीनर महंमद युसुफ यांच्यासह हरिवंदा गायकवाड व स्वाती मिसाळ यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर वाळू वाहतूक करणारा ट्रकचालक गाडीसह फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून इंदापूर व कर्नाटक येथे जाण्यासाठी काही प्रवासी टायर वाहतूक करणाऱ्या गाडीतून प्रवास करत होते. मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते उरुळी कांचन येथील खेडेकरमळा परिसरात आले. याचवेळी खेडेकरमळा येथील ओढ्याच्या बाजूने वाळूने भरलेला ट्रक पुणे-सोलापूर महामार्गावर आला. 
अचानकसमोर आलेला वाळूचा ट्रक पाहून चालक आशिफ शेख याचा गाडीवरील ताबा सुटला व तो अचानकपणे आडवा आलेल्या वाळूच्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातातील जखमींना अजिनाथ कदम व कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मदत करून आपल्या रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर (ता. हवेली) खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.

Web Title: 11 people injured in two truck accident in Uruli Kanchan; Illegal traveler, sand transport issue of on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.