PMPML | पीएमपीचे ग्रामीण भागातील ११ मार्ग आजपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 01:28 PM2022-11-26T13:28:56+5:302022-11-26T13:30:04+5:30

या बसमार्ग संचलनासाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असल्याने पीएमपी प्रशासनाने या मार्गावरील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे...

11 routes of PMP in rural areas are closed from today pune latest news | PMPML | पीएमपीचे ग्रामीण भागातील ११ मार्ग आजपासून बंद

PMPML | पीएमपीचे ग्रामीण भागातील ११ मार्ग आजपासून बंद

Next

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपकाळात ग्रामीण भागातील नागरिकांची हाेणारी गैरसाेय विचारात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपीएमएल) ग्रामीण भागात पीएमपी सेवा सुरू केली होती.

या बसमार्ग संचलनासाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असल्याने पीएमपी प्रशासनाने या मार्गावरील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील या ४० मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरू करावी, असे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला कळविले. त्यावर ४० पैकी ११ मार्गावर एसटी बस सेवा सुरू झाल्याचे एसटी प्रशासनाने पीएमपीला कळविल्यानंतर सदर ११ मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे.

या मार्गांवरील पीएमपी होणार बंद..

१) २३१ - स्वारगेट ते काशिंगगाव

२) २३२ - स्वारगेट ते बेलावडे

३) २९३ - कापूरव्होळ ते सासवड

४) २९६ - कात्रज सर्पोद्यान ते विंझर

५) २११ - सासवड ते उरुळीकांचन

६) २१२ - हडपसर ते मोरगांव

७) २१० - हडपसर ते जेजुरी

८) २२७ - अ. (बीआरटी) मार्केट यार्ड ते खारावडे/लव्हार्डे

९) १३७ - (बीआरटी) वाघोली ते राहूगाव, पारगाव सालू मालू

१०) ३५३ - चाकण, आंबेठाण चौक ते शिक्रापूर फाटा

११) २२० - सासवड ते यवत

शहरात या ११ मार्गावर धावणार पीएमपी

ग्रामीण भागातील बस मार्ग बंद केल्याने पीएमपीकडून २६ नोव्हेंबरपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहर हद्दीतील या मार्गांवर जादा बसचे नियोजन केले आहे.

१) एच ९ डेपो कोअर सिटी - हडपसर ते मांजरी बुद्रूक

२) २९१ - कात्रज ते हडपसर

३) २३५ (बीआरटी) - कात्रज ते खराडी

४) ११५ (बीआरटी) - पुणे स्टेशन ते हिंजवडी माण फेज – ३

५) ३०१ (बीआरटी) - शेवाळेवाडी ते कात्रज

६) २९९ (बीआरटी) - कात्रज, गुजरवाडी स्टॅण्ड ते भोसरी

७) ५७ - पुणे स्टेशन ते वडगाव/वेणूताई

८) के ११ डेपो कोअर सिटी- कात्रज ते जांभूळवाडी

९) २३३ (बीआरटी) - मार्केट यार्ड ते पौडगाव

१०) ३२४ - भोसरी ते हिंजवडी माण फेज – ३

११) १४८ अ - भोसरी ते भेकराईनगर

Web Title: 11 routes of PMP in rural areas are closed from today pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.