धक्कादायक! पुण्यात ११ वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 11:56 AM2022-11-03T11:56:04+5:302022-11-03T11:59:52+5:30

११ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली...

11-year-old boy commits suicide by hanging due to abuse; Shocking incident in Pune | धक्कादायक! पुण्यात ११ वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! पुण्यात ११ वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

- विवेक भुसे

पुणे : घरी आलेल्या मुलाला वारंवार शिवीगाळ केल्याने एका ११ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघा मायलेकींवर गुन्हा दाखल केला आहे. विद्या चंद्रकांत कांबळे आणि साधना चंद्रकांत कांबळे (दोघी रा. लोहियानगर) अशी त्यांची नावे आहेत. रुद्राक्ष लुकेश जाधव (वय ११) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत आशा लुकेशा जाधव (वय ३२, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सात वाजता घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी या एकाच वस्तीत राहतात. फिर्यादी यांचा मुलगा रुद्राक्ष हा सहावीत शिकत होता. तो आरोपींच्या घरी गेला असताना विद्या व तिची आई साधना कांबळे यांनी रुद्राथ याला वाईट शिवीगाळ केली होती. त्या रागातून रुद्राक्ष याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

रुद्राक्षच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल विद्या व साधना कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 11-year-old boy commits suicide by hanging due to abuse; Shocking incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.