जिममध्ये ११ वर्षांच्या मुलावर अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी  

By नम्रता फडणीस | Updated: January 7, 2025 18:01 IST2025-01-07T18:00:57+5:302025-01-07T18:01:01+5:30

पुणे : जिममध्ये व्यायाम करणाऱ्या अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तीस वर्षांच्या आरोपीला खेड-राजगुरूनगर येथील विशेष न्यायालयाने ...

11-year-old boy raped in gym; Accused gets 20 years in prison | जिममध्ये ११ वर्षांच्या मुलावर अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी  

जिममध्ये ११ वर्षांच्या मुलावर अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी  

पुणे : जिममध्ये व्यायाम करणाऱ्या अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तीस वर्षांच्या आरोपीला खेड-राजगुरूनगर येथील विशेष न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने अनैसर्गिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमांनुसार गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने विशेष न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी हा निकाल दिला.

दरम्यान, आरोपीने दंडाची रक्कम भरल्यानंतर ती पीडित मुलाला भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. आरोपीविरोधात पीडित मुलाच्या आईने तक्रार दिली होती. ही घटना १ जानेवारी २०२२ रोजी जुन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यादिवशी सायंकाळी पाच वाजता तक्रारदारांचा मुलगा जिममध्ये गेला. तो एकटा व्यायाम करत असताना, आरोपी तिथे आला. आरोपीने जिमचे दार-खिडक्या लावून घेत मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत मुलाने रडत-रडत घर गाठले. आईने विचारणा केली असता, त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आईने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी आरोपीविरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ (अनैसर्गिक अत्याचार) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ४, ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपनिरीक्षक वाय. वाय. पाटील यांनी आरोपीला अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील विकास देशपांडे यांनी बाजू मांडली. त्यांनी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडित मुलाचे वय १६ पेक्षा कमी असल्याने आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ सह पाॅक्सो कायद्याच्या कलम ४, ८ व १२ अन्वये गुन्हा सिद्ध होतो. त्यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा ठोठावण्यात, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विकास देशपांडे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

Web Title: 11-year-old boy raped in gym; Accused gets 20 years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.