पुणे हादरले! वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामाने केला ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:28 AM2022-03-19T11:28:21+5:302022-03-19T11:41:14+5:30

मुलीच्या वडिलांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत केले अत्याचार

11 year old girl was allegedly raped by her brother father grandfather and uncle | पुणे हादरले! वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामाने केला ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

पुणे हादरले! वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामाने केला ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

Next

पुणे : ताडीवाला रोड येथे राहणार्‍या एका ११ वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामा अशा चौघांनी सातत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक केल्याचा समोर आला आहे. क़ोरेगाव पार्क येथील एका इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये केलेल्या समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी २९ वर्षाच्या एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पिडित मुलीचे वडील (वय ४५), भाऊ (वय १४), आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कमधील एका शाळेत ११ वर्षाची ही पिडित मुलगी शिकत आहे. फिर्यादी महिला या समुपदेशक म्हणून काम करतात. विद्यार्थ्यींनाना मार्गदर्शन करण्यासाठी त्या या शाळेत गेल्या होत्या.  मुलींना त्या ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत होत्या. त्यावेळी या मुलीने आपल्यावर गेल्या ४ वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.

ही मुलगी २०१७ मध्ये बिहारमध्ये असताना तिच्या वडीलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नोव्हेबर २०२० मध्ये ही ताडीवाला रोड येथे असताना तिचा १४ वर्षाचा मोठा भावाने तिच्याबरोबर बर्‍याच वेळा जबरदस्तीने शारीरीक संबंध करुन धमकी दिली.

जानेवारी २०२१ मध्ये तिचे आजोबांनी तिच्याशी गैरवर्तन केले तर मे २०२१ मध्ये तिचा चुलत मामाने तिच्याबरोबर गैरवर्तन केले आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करीत आहेत.

Web Title: 11 year old girl was allegedly raped by her brother father grandfather and uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.