पुणे महापालिकेकडे विद्यापीठाचे अकराशे कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 02:34 PM2019-12-16T14:34:45+5:302019-12-16T14:46:47+5:30

विद्यापीठाची सुमारे २५ एकर जागा पुणे महापालिकेने रस्ते तयार करण्यासाठी घेतली..

1100 crore rupees will give to university by pune corporation | पुणे महापालिकेकडे विद्यापीठाचे अकराशे कोटी

पुणे महापालिकेकडे विद्यापीठाचे अकराशे कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठाला मिळेना बिल्डिंग कम्प्लाइन्स सर्टिफिकेटविकास कराच्या सुविधा पालिका देत नाही विद्यापीठाचा पुणेकरांच्या पैशांवर दरोडा पालिकेने विद्यापीठाला तब्बल अकराशे कोटी रुपये देणे अपेक्षित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१८-१९ वर्षाचा लेखा परीक्षणाचा अहवाल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाची सुमारे २५ एकर जागा पुणे महापालिकेने रस्ते तयार करण्यासाठी घेतली असून या जागेचा मोबदला म्हणून पालिकेने विद्यापीठाला तब्बल अकराशे कोटी रुपये देणे अपेक्षित आहे. तर पालिकेला विकास करापोटी विद्यापीठाला सुमारे २०० कोटी रुपये रक्कम द्यावे लागणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी अधिसभेत सांगितली. तसेच विद्यापीठाची जागा शासकीय आहे किंवा नाही याबाबत सध्या संभ्रम असून जागेच्या वादावरील चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोणी कोणाला किती रक्कम द्यावी, यासंदर्भात स्पष्टता येणार आहे, असेही करमळकर यांनी यावेळी नमूद केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१८-१९ वर्षाचा लेखा परीक्षणाचा अहवाल विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी शनिवारी अधिसभेसमोर सादर केला. त्यावेळी अधिसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी उत्तर दिले. त्यात पालिकेकडून जागेच्या मोबदल्यात अकराशे कोटी रुपये तर विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विभागाला समाज कल्याण विभागाकडून ७ ते ८ कोटी मिळाले अपेक्षित असल्याचे नमूद केले. विद्यापीठाने सुरू केलेल्या विविध अभ्यासक्रमांची नावे शासनाच्या शिष्यवृत्तीच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असेही करमळकर यांनी सांगितले.
प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, गेल्या काही वर्षात शासनाकडून विद्यापीठाला मिळणारा निधी कमी झाला आहे. तसेच विद्यापीठ फंडातील काही कोटी रक्कम कर्मचाºयांच्या वेतनावर खर्च होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने आपले खर्च कमी केले आहेत. परंतु, विद्यार्थी विकास, शिक्षक प्रशिक्षणाकडे अधिक लक्ष दिले आहे.विद्यापीठाच्या ठेवी सुरक्षित असून विद्यापीठाकडील पैशांचा विनियोग तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. 
.....
अंतिम निर्णयानंतर काय होणार? 
विद्यापीठाला २५ एकर जागेचा अकराशे कोटी रुपयांचा मोबदला मिळणे शक्य नाही. परंतु, विद्यापीठाला विकासकर भरण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट झाले तर विद्यापीठाची मोठी रक्कम वाचणार आहे. वाचणारा निधी विद्यापीठाच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरता येणार आहे.
.....
विधान परिषदेत झाली होती चर्चा 
विद्यापीठाकडून पालिकेला डेव्हलपमेंट चार्ज दिला जात नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अनेक इमारतींना कंप्लाईन्स सटिर्फिकेट मिळाले नाही. या संदर्भात तीन ते चार वर्षांपूर्वी विधान परिषदेत आमदार अनंत गाडगीळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे उत्तरही दिले होते.परंतु, अद्याप हा प्रलंबित आहे.
....
विद्यापीठ शासनाने दिलेल्या भाडेतत्त्वावरील जागेत आहे. त्यामुळे भाडेकरूला जागेचा मोबदला मागता येत नाही. तसेच जागा कोणाची याबाबत संभ्रम असेल तर विद्यापीठाने व महापालिकेने राज्याचे महाधिवक्ता आणि कायदेमंडळाकडे जावून याबाबत सुस्पष्टता घ्यावी. अनेक वर्ष हा गोंधळ सुरू ठेवणे योग्य नाही. - विवेक वेलणकर, 
सजग नागरिक मंच
.....
विद्यापीठाचा पुणेकरांच्या पैशांवर दरोडा 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला शासनाकडून भाडेतत्त्वावर जागा मिळालेली आहे. त्यामुळे पालिकेने रस्त्यांसाठी घेतलेल्या जागेचा मोबदला विद्यापीठाला मागता येत नाही. तसेच सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे पुणे महापालिकेकडून विद्यापीठाला पाणी, स्ट्रीट लाईट, डेÑनेज आदी सुविधा दिल्या जातात. विद्यापीठ विकास कर चुकवत असेल तर पुण्यातील नागरिकांच्या पैशावर हा दरोडा आहे.
- अतुल बागुल, माजी, अधिसभा सदस्य.
........
विकास कराच्या सुविधा पालिका देत नाही 
विद्यापीठाची जागा शासकीय असल्याचे मानून महापालिकेने विद्यापीठाकडून रस्त्यांसाठी सुमारे २५ एकर जागा अधिगृहित केली. शासकीय जागा असल्याने या जागेचा मोबदला विद्यापीठाला दिला नाही. जर विद्यापीठाची जागा शासकीय असेल तर या जागेतील बांधकामांना विकास कर लागू होत नाही. तसेच पालिकेकडून विकास कर आकारणीसाठीची कोणतीही सुविधा विद्यापीठाला दिली जात नाही.विद्यापीठ स्वत: रस्ते, स्ट्रीट लाईट, टेÑनेज लाईन आदी कामे करते.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Web Title: 1100 crore rupees will give to university by pune corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.