राज्यात आगामी वर्षात ११२ लाख टन साखर निर्मिती होणार ; इथेनॉल ऊत्पादन वाढविण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 04:22 PM2021-06-25T16:22:01+5:302021-06-25T17:22:57+5:30

साखरेचे उत्पादन वाढले मात्र साखर कारखान्यांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची चिन्हे आहेत.

112 lakh tonnes of sugar produced next year in the country | राज्यात आगामी वर्षात ११२ लाख टन साखर निर्मिती होणार ; इथेनॉल ऊत्पादन वाढविण्यावर भर

राज्यात आगामी वर्षात ११२ लाख टन साखर निर्मिती होणार ; इथेनॉल ऊत्पादन वाढविण्यावर भर

googlenewsNext

पुणे: राज्यात ऊसाचे क्षेत्र यंदा वाढले आहे. त्यामुळे साखरेचे ऊत्पादन तब्बल ११२ लाख टन होईल. साखरेचा खप कमी झाल्याने यातून साखर कारखान्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
साखर आयूक्त कार्यालयाकडून पुढील वर्षीच्या गाळप हंगामाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार १२.३२ लाख हेक्टरवर ऊस ऊभा आहे. त्यातून १०९६ लाख टनाचे गाळप होईल. त्यामधून ११२ लाख टन साखर निर्माण होईल. १० लाख टन ऊस इथेनॉलसाठी शिल्लक ठेऊन हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी किमान १३० कोटी इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट असणार आहे. 

मागील वर्षी १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. त्यातून गाळप होऊन १०६ लाख टन साखरचे ऊत्पादन झाले. त्याआधीची सुमारे ४० लाख टन साखर कारखान्यांकडे शिल्लक आहे. निर्यातीसाठी अनूदान द्यावे लागत असल्याने केंद्र सरकार देशासाठी ६० लाख टनांच्या पुढे कोटा वाढवून द्यायला तयार नाही. देशात आरोग्यविषयक जागरूकता  वाढली आहे, त्यामुळे साखरेचा अपेक्षित खप होत नाही. कारखान्यांना साखर गोडाऊनमध्ये शिल्लक ठेवावी लागते. यातून सध्याच साखर कारखान्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. येत्या वर्षाच्या साखर ऊत्पादनातून त्यात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

--// 

साखर उद्योगाला आता अपरिहार्यपणे इथेनॉल निर्मितीकडे वळावे लागेल. त्यादृष्टीने नियोजन सुरूही झाले आहे. मागील वर्षी ६ लाख टन गाळप इथेनॉलकडे वळवून १०८ कोटी लिटर इथेनॉलचे उद्दिष्ट गाठले गेले. पुढील वर्षी १० लाख टन गाळप साखरेऐवजी इथेनॉलकडे वळवून १३० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त उद्दिष्ट दिले जाईल अशी शक्यता आहे. 
शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

Web Title: 112 lakh tonnes of sugar produced next year in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.