१२ अवैध वाळू ट्रकवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:51 AM2017-07-31T04:51:29+5:302017-07-31T04:51:29+5:30

हवेली तालुका महसूल विभागाने शेवाळवाडी येथ रविवारी १२ अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रकवर कारवाई केली. सुटीच्या दिवशी कारवाई झाल्याने वाळूमाफियांची धावपळ उडाली.

12-avaaidha-vaalauu-tarakavara-kaaravaai | १२ अवैध वाळू ट्रकवर कारवाई

१२ अवैध वाळू ट्रकवर कारवाई

Next

लोणी काळभोर : हवेली तालुका महसूल विभागाने शेवाळवाडी येथ रविवारी १२ अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रकवर कारवाई केली. सुटीच्या दिवशी कारवाई झाल्याने वाळूमाफियांची धावपळ उडाली. या कारवाईमधून ३५ हजार रुपये प्रतिब्रासप्रमाणे शासनाकडे सुमारे १७ लाख रुपयांचा महसूल जमा होणार असल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.
हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, नायब तहसीलदार सुनील शेळके, महसूल नायब तहसीलदार समीर यादव यांच्या उपस्थितीत महसूल पथकाने पहाटे सहा वाजता कारवाई केली. त्यांनी ताब्यात घेतलेल्या वाहनचालकांकडे कोणतेही शासकीय चलन आढळून आले नाही. सर्वच वाहनांमध्ये विहीत क्षमतेपेक्षा जास्त वाळू आढळून आली आहे. या सर्व ट्रकमध्ये सरासरी चार ब्रासपेक्षा जास्त वाळू असल्याची माहिती महसूल पथकाने दिली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी जकातनाका ते मांजरी उपबाजार समिती या दरम्यानच्या महामार्गावर अनेकांनी आपले अनधिकृत वाळूचे विक्रीचे दुकान राजरोसपणे मांडले आहे. रोजच याठिकाणी सकाळी व सायंकाळी वाहनांमधून मोठ्या प्रमाणांत वाळूची विक्री केली जाते.
त्याविषयीच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यामुळे महसूल विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यांचबरोबर सोरतापवाडी व कुंजीरवाडी येथील वाळू धुण्याच्या ठिकाणी दोन वाळूच्या ट्रकवर कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेली सर्व
वाहने दंडात्मक कारवाईसाठी
ऊरुळी कांचन येथील पोलीस चौकीच्या ताब्यात दिली आहे. पथकामध्ये मंडल अधिकारी किशोर शिंगोटे, महमंदवाडीचे तलाठी दिलीप पलांडे, योगिराज कनिचे, प्रदीप जवळकर, कोतवाल रामलिंग भोसले, गोविंद महाडीक, योगेश पवार यांचा समावेश होता.

Web Title: 12-avaaidha-vaalauu-tarakavara-kaaravaai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.