नियोजन समितीकडून दौंडसाठी १२ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:31+5:302021-08-19T04:14:31+5:30
केडगाव: दौंड तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी, तसेच नागरी सुविधा व जनसुविधा अंतर्गत लहान व मोठ्या ग्रामपंचायतीच्या ...
केडगाव: दौंड तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी, तसेच नागरी सुविधा व जनसुविधा अंतर्गत लहान व मोठ्या ग्रामपंचायतीच्या सुविधांसाठी सुमारे १२ कोटी २० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मिळाला असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंड तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी अंतर्गत रस्ते गटारलाईन, ग्रामपंचायत कार्यालय यासाठी निधी मिळणेबाबत ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मागणी केली होती, त्यानुसार आमदार राहुल कुल यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा करून हा निधी मिळविला आहे. यापुढील काळात देखील तालुक्यातील सर्व गावांना निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी या वेळी सांगितले आहे.
इतर जिल्हा मार्ग अंतर्गत एकूण ३ कोटी रुपये मिळाले असून त्यामध्ये दौंड-गोपाळवाडी एमआयडीसी रस्ता (इजिमा १६३) एक कोटी, राष्ट्रीय महामार्ग ९ ते लोणारवाडी काळेवाडी चौक रस्ता (इजिमा १७५) एक कोटी, राष्ट्रीय महामार्ग ९ पांढरेवाडी ते बारामती पाटस रस्ता (इजिमा १७१) ५० लाख, बेटवाडी ते नवीन गार रस्ता (इजिमा १६६) ५० लाखांचे काम होणार आहे.
ग्रामीण मार्ग अंतर्गत एकूण ३ कोटी रुपये मिळाले असून त्यामध्ये पडवी-माळवाडी रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग २४१) ५० लाख, गाडीमोडी ते शेलारवाडी रस्ता करणे (ग्रामीण मार्ग ४४) ३० लाख, ग्रामीण मार्ग ५१ ते भरतगाव रस्ता करणे ३० लाख, खोर येथील गायकवाड वस्त- लवांडे वस्ती-फरतरेवस्ती रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग १६४) २० लाख, खोर येथील हरिबाचीवाडी रस्ता करणे (ग्रामीण मार्ग १०४) २० लाख, केडगाव ते हंडाळवाडी रस्ता करणे (ग्रामीण मार्ग २१)३० लाख, राहू ते माधवननगर रस्ता करणे (ग्रामीण मार्ग ७२) ४०लाख, राहू, सहकारनगर ते पाटलाचा मळा (रानमळा) रस्ता करणे (ग्रामीण मार्ग ६४/२७८) ३० लाख, वरवंड माळवाडी रोड ते फरगडेवस्ती रस्ता करणे (ग्रामीण मार्ग २७३)२० लाखांचे काम होणार आहे. नागरी सुविधा अंतर्गत रस्ते करणेसाठी ३ कोटी २० लाख मिळाले असून कासुर्डी २५लाख, कुरकुंभ २५लाख, केडगाव २५लाख, खडकी २५लाख, पाटस २५लाख, पिंपळगाव२५लाख, बोरीपार्धी२५लाख, यवत२५लाख, राजेगाव२५लाख, राहु ३० लाख, लिंगाळी २५लाख, वरवंड २५लाख, खडकी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम १५लाख, तर जनसुविधा अंतर्गत रस्ते करण्यासाठी ३ कोटी मिळाले असून त्यामध्ये आलेगाव २०लाख, एकेरीवाडी १०लाख, कडेठाण१०लाख, कुसेगाव१५लाख, खानोटा १० लाख, खोर १०लाख, डाळिंब १०लाख, दापोडी १०लाख, देऊळगाव राजे२०लाख, नाथाचीवाडी२०लाख, पिलाणवाडी १०लाख, बोरीबेल२०लाख, मलठण२लाख, मळद १०लाख, रावणगाव २०लाख, वाखारी १०लाख, वाटलुज १०लाख, वासुंदे १०लाख, सहजपूर १०लाख, स्वामी चिंचोली २०लाख, हिंगणीबेर्डी १०लाख, उंडवडी ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम -१५ लाख अशा प्रकारे इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी तसेच नागरी सुविधा व जनसुविधांसाठी सुमारे १२ कोटी २० लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे.
180821\fb_img_1629284638609.jpg
आमदार राहुल कुल यांचा फोटो