नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:59+5:302021-09-09T04:13:59+5:30

पतसंस्थेच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षीय भाषणात चेअरमन सोनवणे म्हणाले की, पतसंस्थेवर सहकारी बँक अथवा इतर कोणत्याही बँकेचे कोणतेही ...

12% dividend to the members of Nagar Parishad Kamgar Patsanstha | नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश

नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश

Next

पतसंस्थेच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षीय भाषणात चेअरमन सोनवणे म्हणाले की, पतसंस्थेवर सहकारी बँक अथवा इतर कोणत्याही बँकेचे कोणतेही कर्ज नाही. संस्थेचे भाग भांडवल २,५३,००,०००/- असून बँकेत १ लाख ४८,००,०००/- रुपये बचत खात्यामध्ये शिल्लक आहेत. संस्थेच्या सभासदांना अत्तापर्यंत संस्थेने ३,५७,००,०००/- रुपये इतके कर्ज वाटप केलेले आहे. यंदाच्या वर्षी संस्थेला ४२ लाख ९ हजार ३६३ इतका नफा झाल्याचे सोनवणे म्हणाले.

यावेळी व्हाईस चेअरमन राजू सुपेकर, संचालक देविदास साळुके, अतुल बनकर, भालचंद्र ढमे, अनिल शिंदे, राजेंद्र शिंदे, नीलेश आहिवळे, अरुण थोरात, हनुमंत गायकवाड, संजय गडियल, प्रतिभा सोनवणे, सखू श्याम खरात, अनिल गोंजारी उपस्थित होते. आभार देविदास साळुके यांनी मानले.

बातमी सविस्तर आवश्यक

Web Title: 12% dividend to the members of Nagar Parishad Kamgar Patsanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.