पुणे-सातारा महामार्गावर १२ तास कोंडी

By admin | Published: November 23, 2015 12:51 AM2015-11-23T00:51:08+5:302015-11-23T00:51:08+5:30

केळवडे येथे पहाटेच्या सुमारास गॅसची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या अपुऱ्या कामालगत पुणे-सातारा महामार्गावर पलटी झाला. यामुळे बारा तासांहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

12 hours duration on Pune-Satara highway | पुणे-सातारा महामार्गावर १२ तास कोंडी

पुणे-सातारा महामार्गावर १२ तास कोंडी

Next

नसरापूर : केळवडे येथे पहाटेच्या सुमारास गॅसची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या अपुऱ्या कामालगत पुणे-सातारा महामार्गावर पलटी झाला. यामुळे बारा तासांहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आज रविवारी पहाटे सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारा टँकर (एमएच ०६ के ५७१५) हा सातारा महामार्गावरील केळवडे येथील रोहित हॉटेलजवळील रस्त्यालगत पलटी झाला. रस्त्यावर जोरात पडल्याने या अपघातग्रस्त टँकरमधून वायू गळती सुरू झाली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी महामार्गाच्या दोन्ही बाजुस वाहतूक थांबवून सातारा बाजुकडून येणाऱ्या वाहनांची वाहतूक कापूरहोळमार्गे सासवड वळविली. तर खेड-शिवापूर टोलनाक्यावरच वाहनांची वाहतूक थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. सुमारे १० किमीपर्यंत ट्रॅफिक जॅम झाल्याने पोलिसांची दमछाक होत होती. सकाळी अग्नीशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तर या अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरताना वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यावेळी गळती थांबविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. बघ्याच्या गर्दीमुळे पोलिसांना कामात अडथळा येत होता. या अपघातामुळे मात्र प्रवाशांचे खूपच हाल झाले. कामाला जाणारे अनेक कामगार या अपघातामुळे कामाला जाऊ शकले नाहीत. महामार्गाला पर्यायी असणाऱ्या रस्त्यावरून पोलीस व जाणकारांच्या मदतीने वाहतूक वळवळी गेली. या वाहतूक कोंडीवेळी अनेक अतिउत्साही प्रवाशी आपापली वाहने पुढे दामटण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता.

Web Title: 12 hours duration on Pune-Satara highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.