बाराशे दादा-मामांना 12 लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 09:50 PM2018-06-14T21:50:20+5:302018-06-14T21:50:20+5:30
वाहनचालकांकडून फॅन्सी नंबरप्लेट अापल्या वाहनांना लावण्यात येते. अश्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत असून मे 2018 पर्यंत अस्या 1201 वाहनचालकांवर कारवाई करण्यात अाली अाहे.
पुणे : वाहन क्रमांकाची माेड ताेड करुन त्यांना मामा, दादा अश्या नावांमध्ये बदलून फॅन्सी नंबरप्लेट लावणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडले अाहे. अश्या फॅन्सी नंंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक विभागाकडून नियमित कारवाई करण्यात येत असून या वर्षात मे महिन्यापर्यंत फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या 1201 वाहनचालकांवर कारवाई करण्यात अाली अाहे.
अापल्या गाडीवरील नंबरप्लेट सर्वांच्या लक्षात रहावी तसेच रस्त्यावरुन जाताना सर्वांचे अापल्या नंबरप्लेटकडे लक्ष जावे यासाठी अनेक वाहनचालकांकडून फॅन्सी नंबरप्लेट वाहनांना लावली जाते. या फॅन्सी नंंबरप्लेटमुळे अनेकदा वाहनाचा क्रमांक अाेळखने अवघड जाते. अश्या वाहनचालकांकडून नियम माेडल्यास किंवा एखादा अपघात घडल्यास त्यांचा शाेध घेणे पाेलीसांसाठी डाेकेदुखी असते. काही वाहनचालक अापल्या मुलांचे किंवा अावडीचे नाव नंबरप्लेटवर लिहिता यावे यासाठी काही विशिष्ट क्रमांकाची मागणी प्रादेशिक परिवहन खात्याकडे (अारटीअाे) करत असतात. त्यासाठी जास्त पैसे माेजण्यासही ते तयार असतात. अारटीअाेच्या नियमांनुसार नंबरप्लेट वाहनांना लावणे अपेक्षित असते. अारटीअाेच्या नियमानुसार नंबरप्लेटवर नंबर व्यतिरिक्त काहीही लिहिता येत नाही. परंतु काही नागरिकांकडून अारटीअाेचे नियम धाब्यावर बसवत विविध शब्द लिहिले जातात. जानेवारी ते मे 2018 या कालावधीत अश्या 1201 वाहनचालकांवर वाहतूक पाेलीसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून 12 लाख एक हजार रुपये इतका दंड वसून करण्यात अाला अाहे. मागील वर्षी 3 हजार चारशे 42 वाहनचालकांकडून 30 लाख 87 हजार 400 इतका दंड वसून करण्यात अाला हाेता.
याबाबात बाेलतना वाहतूक उपायुक्त अशाेक माेराळे म्हणाले, फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर नियमित कारवाई करण्यात येते.पिंपरी-चिंचवडमध्ये फॅन्सी नंबरप्लेट लावण्याचे प्रमाण अधिक अाहे. यापुढेही अश्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी अारटीअाेच्या नियमांप्रमाणेच नंबरप्लेट अापल्या वाहनाला लावावी.