दीडशे रुपयांसाठी १२ लाख विद्यार्थ्यांना काढावे लागणार बँक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:14+5:302021-07-02T04:09:14+5:30

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये देशातील तब्बल ८० कोटी लाभार्थ्यांना दरमहा पाच किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वाटप केले ...

12 lakh students will have to open a bank account for Rs | दीडशे रुपयांसाठी १२ लाख विद्यार्थ्यांना काढावे लागणार बँक खाते

दीडशे रुपयांसाठी १२ लाख विद्यार्थ्यांना काढावे लागणार बँक खाते

Next

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये देशातील तब्बल ८० कोटी लाभार्थ्यांना दरमहा पाच किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वाटप केले जाते. मोफत धान्य तरतुदीचा एक भाग म्हणून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत २०२१ च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक विशेष कल्याणकारी उपाय म्हणून डीबीटीद्वारे बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याचे आधार लिंक बँक खाते अद्ययावत करून तयार ठेवावे, तसेच ज्या विद्यार्थ्याचे बँक खाते उघडण्यात आले नाही. अशांना खाते उघडण्याबाबत शाळांनी, पालकांना आवश्यक सहकार्य करावे, असे परिपत्रक राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी नुकतेच प्रसिद्ध केले.

---------------------------------

शासन आदेशानुसार सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँक खाते काढून ठेवण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पालकांनी घराजवळील बँकेत झीरो बॅलन्सने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडावे, असे यापूर्वीच शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

--------------

पुणे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या

पहिली - १,९०,०६१

दुसरी- १,९२,५९२

तिसरी - १,९०,१३७

चौथी - १,९०,५७५

पाचवी -१,८६,९९६

सहावी -१,८३,२१४

सातवी -१,७७,८७३

आठवी -१,७०,८२२

----------

* पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६ रुपये

* सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - २३४ रुपये

----------------

कोरोना काळात दीडशे ते दोनशे रुपये मिळण्यासाठी बँकेत खाते उघडण्यास सांगणे संयुक्तिक नाही. बँकेने खाते उघडण्यासाठी एक हजार रुपये शुल्क सांगितले तर पालकांनी काय करावे. त्यामुळे शाळांनीच विद्यार्थ्यांचे झीरो बॅलन्स बँक खाते उघडून द्यावे.

- सुवर्णा सूर्यवंशी, पालक

Web Title: 12 lakh students will have to open a bank account for Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.