पुण्यात जानेवारीत खुनाच्या १२ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:24 AM2019-01-30T03:24:14+5:302019-01-30T03:24:32+5:30

अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग; ३ वर्षांत १,२०० मुले रेकॉर्डवर

12 murders in Pune in January | पुण्यात जानेवारीत खुनाच्या १२ घटना

पुण्यात जानेवारीत खुनाच्या १२ घटना

Next

पुणे : किरकोळ कारणावरून, वैयक्तिक वैमनस्यातून या जानेवारीच्या पहिल्या २८ दिवसांत शहरात खुनाच्या तब्बल १२ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांशी तुलना करता त्यात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते़ या गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढत असलेला सहभाग चिंताजनक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

सिंहगड रोड येथे येथे गेल्या रविवारी रोहन साळवी या तरुणाचा चौघांनी कोयत्याने वार करून खून केला़ ही चौघेही अल्पवयीन मुले आहेत़
गेल्या आठवड्यात वडगाव बुद्रुक येथे चाजनिज गाडी लावणाऱ्या एकाचा तीन अल्पवयीन मुलांनी खून केला होता़ याशिवाय वाहनचोरी, घरफोडी, तसेच दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणाºयांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढत सहभाग दिसून येत आहे़ डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारती विद्यापीठात दोन टोळ्यांमधील वैमनस्यातून खुनाची घटना घडली होती़ २०१७मध्ये जानेवारी महिन्यात खुनाच्या ८ घटना घडल्या होत्या, तर २०१७मध्ये २ आणि २०१६ मध्ये खुनाच्या ६ घटना घडल्या होत्या.

याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले, की अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील वाढता सहभाग हा चिंताजनक आहे़ जानेवारी महिन्यात आतापर्यंत झालेल्या खुनाच्या १२ घटनांपैकी केवळ दत्तवाडी येथील खुनामधील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे़ इतर घटना या वैयक्तिक व कौटुंबिक कारणातून घडल्या आहेत़ गेल्या तीन वर्षांत एकूण १ हजार २०० अल्पवयीन मुले गुन्हे करताना सापडले आहेत़ पोलिसांच्या रेकॉर्डवरील या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात या मुलांच्या पालकांसमवेत बैठका घेण्यात येत आहे़ आतापर्यंत १५ पोलीस ठाण्यांत या बैठकांत त्यांचे समुपदेशन झाले़ अन्य ठाण्यांतही अशा बैठका घेण्यात येणार आहेत.

अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी प्रयत्न
विधिसंघर्षग्रस्त मुलांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी शहर पोलीस दलाने सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही मुले व त्यांचे पालक यांच्या बैठका आयोजित करण्यास सुरुवात केली आहे़ दुसºया टप्प्यात भरोसा सेलमार्फत त्यांचा मेळावा आयोजित करून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे़ तसेच, समाजातील आयकॉन असलेल्या व्यक्तीशी त्यांचा संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
- शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त

Web Title: 12 murders in Pune in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.