आळंदी परिसरात आढळले १२ डुक्‍कर बॉम्ब; वडमुखवाडी, चऱ्होली भागात दहशतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 01:58 PM2022-04-09T13:58:29+5:302022-04-09T13:58:45+5:30

दोन महिन्यांपूर्वी डुक्‍कर बॉम्बच्या स्फोटात पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता

12 pig bombs found in alandi area terror in wadmukhwadi charholi area | आळंदी परिसरात आढळले १२ डुक्‍कर बॉम्ब; वडमुखवाडी, चऱ्होली भागात दहशतीचे वातावरण

आळंदी परिसरात आढळले १२ डुक्‍कर बॉम्ब; वडमुखवाडी, चऱ्होली भागात दहशतीचे वातावरण

Next

आळंदी : दोन महिन्यांपूर्वी वडमुखवाडी, चऱ्होली येथे झालेल्या डुक्‍कर बॉम्बच्या स्फोटात पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्या मुलीच्या आईला त्याच परिसरात पुन्हा तसलेच बॉम्ब दिसले. पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता परिसरात शुक्रवारी (दि. ८) आणखी १२ डुक्‍कर बॉम्ब सापडून आले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुपारी एवढ्या आकाराच्या दोरा गुंडाळलेली वस्तू फोडत असताना चऱ्होली, वडमुखवाडीतील अलंकापुरम सोसायटीजवळच्या नानाश्री हॉटलेमागे गाईच्या गोठ्याजवळ ५ फेब्रुवारी २०२२ रोजी डुक्‍कर बॉम्बचा स्फोट होऊन राधा गोकुळ गवळी (वय ५ वर्षे) या बालिकेचा मृत्यू झाला होता. तर राजेश महेश गवळी (वय ४) आणि आरती गोकुळ गवळी (वय ४) ही दोन मुले गंभीर जखमी झाली होती. हे बॉम्ब येथून जवळच राहणाऱ्या झोपडीतील दोन तरुणांनी तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार येथील झोपड्याही उठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान शुक्रवारी सकाळी मयत राधा हिच्या आईला आणखी दोन डुक्‍कर बॉम्ब परिसरात दिसून आले. सदरची माहिती तिने आपल्या पतीला दिली. पतीनेही याबाबत पोलिसांना कळविले असता दिघी पोलीस आणि पुण्यातील बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या परिसरात शोध घेतला असता त्यांना पुन्हा १२ डुक्‍कर बॉम्ब मिळून आले. सदरचे बॉम्ब फेब्रुवारी महिन्यातील त्या घटनेच्या वेळीचे असावेत, अशी शक्‍यता दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप शिंदे यांनी व्यक्‍त केली.

Web Title: 12 pig bombs found in alandi area terror in wadmukhwadi charholi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.