बारा पोलीस ठाण्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:29 AM2017-07-28T06:29:49+5:302017-07-28T06:30:14+5:30
पुणे शहरात डेंगीने डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर, महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी डेंगीच्या अळ्या सापडतील, अशा ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे
पुणे : पुणे शहरात डेंगीने डोके वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर, महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी डेंगीच्या अळ्या सापडतील, अशा ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवणाºया डेंगी, चिकुनगुनिया आदी आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे शहरात जून महिन्यापासून खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. या पाहणीतून आतापर्यंत १२ पोलीस ठाण्यांना डेंगीच्या पार्श्वभूमीवर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
महापालिकेतर्फे १९ जूनपासून शहरात खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी डेंगीच्या अळ्या, डासोत्पत्तीची ठिकाणे आदींची पाहणी करण्यात येत आहे. डासोत्पत्ती स्थाने आढळल्यास नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाई केली जात आहे. खासगी आणि सार्वजनिक सोसायट्या, इमारती, शासकीय आणि निमशासकीय इमारती, बस डेपो, पोलीस ठाणी आदी ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. बºयाच पोलीस ठाण्यांमध्ये भंगार, अडगळीतील वस्तू, साठवून ठेवलेले पाणी यांमुळे डासांची पैदास होण्याची शक्यता असते. अशी संभाव्य ठिकाणे आढळल्यास महापालिकेकडून नोटिसा पाठविल्या जात आहेत.