पुण्यात शुक्रवारी १२ हजार ८८४ जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:29+5:302021-05-01T04:11:29+5:30

पुणे : महापालिकेच्या विविध केंद्रांच्या माध्यमातून शुक्रवारी दिवसभरात १२ हजार ८८४ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या महापालिकेकडील सर्व ...

12 thousand 884 people vaccinated in Pune on Friday | पुण्यात शुक्रवारी १२ हजार ८८४ जणांना लसीकरण

पुण्यात शुक्रवारी १२ हजार ८८४ जणांना लसीकरण

Next

पुणे : महापालिकेच्या विविध केंद्रांच्या माध्यमातून शुक्रवारी दिवसभरात १२ हजार ८८४ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या महापालिकेकडील सर्व लस संपल्या असून, शनिवार दि. १ मे व रविवार दि. २ मे रोजी महापालिकेची सर्वच्या सर्व म्हणजे ११४ लसीकरण केंद्र लससाठा नसल्याने पूर्णपणे बंद राहणार आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात १२ हजार ८८४ लस पैकी ४ हजार २६२ जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर १४९, फ्रंट लाईन वर्कर ४०९, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक १ हजार १३७ तर ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या २ हजार ५६७ इतकी आहे.

तर लसीकरणाचा दुसरा डोस हा हेल्थ केअर वर्कर ४४५, फ्रंट लाईन वर्कर ६९९, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक ५ हजार ५९१ तर ४५ वर्षांवरील १ हजार ९८७ जणांना देण्यात आला आहे.

१६ जानेवारी, २०२१ पासून ३० एप्रिल, २०२१ पर्यंत पुणे शहरात एकूण ८ लाख ३९ हजार ७४१ जणांना लसीकरण करण्यात आले आहेत. यामध्ये १ लाख ७७ हजार ५ जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यात दोन्ही डोस पूर्ण झालेला सर्वाधिक वर्ग हा ६० वर्षे वयापुढील असून, आत्तापर्यंत ८६ हजार ७२२ जणांना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे.

--------------------

Web Title: 12 thousand 884 people vaccinated in Pune on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.