ओतूरला १२ हजार कांदा पिशवी आवक

By admin | Published: March 25, 2017 03:35 AM2017-03-25T03:35:21+5:302017-03-25T03:35:21+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची उपबाजारपेठ ओतूर (ता. जुन्नर) येथे गुरुवार बाजारच्या निमित्ताने ११ हजार ९६३ कांदा पिशव्यांची

12 thousand onion bags coming in Outer | ओतूरला १२ हजार कांदा पिशवी आवक

ओतूरला १२ हजार कांदा पिशवी आवक

Next

ओतूर : कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची उपबाजारपेठ ओतूर (ता. जुन्नर) येथे गुरुवार बाजारच्या निमित्ताने ११ हजार ९६३ कांदा पिशव्यांची व २९२ बटाटा पिशव्यांची आवक झाली. कांद्याच्या प्रतवारीनुसार प्रति १० किलोस ३० रु. ते ६५ रु.भाव मिळाल्याची माहिती कृषी बाजार समितीचे संचालक संतोष तांबे व रंगनाथ घोलप यांनी दिली.
रविवारी (दि. १९) रोजी ९६४७ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रति १० किलोस ३० ते ७० रु. भाव होता. तरकारी मालास ८४९ पिशव्या वाटाण्याची आवक होऊन प्रतिकिलो १२ रु. वाढ झाली आहे, असे कार्यालयीन प्रमुख स्वप्निल काळे यांनी सांगितले.
तरकारी मालाची आवक व बाजारभाव प्रति १० कि. प्रमाणे :
फ्लॉवर २३०४ पि.- ४० रु. ते १२५ रु., कोबी ५६५ पि.- २० ते ५० रु., फरशी १९३ पि.- ३०० ते ४८० रु., वालवड ३०६ पि.- २०० ते ३२५ रु., काकडी ४१ पि.- १०० ते २३५ रु., मिरची ६१ पि.- २५० ते ३४० रु., घेवडा १३० पि. २०० ते ३३० रु., वांगी २६७ पि.- १०० ते २०० रु., डांगर ११ पि.- १०० ते २०० रु., बीट २१६ पि.- १०० ते २०० रु., गाजर ९६ पि.- ६० त १२५ रु., चवळी ३० पि.- २०० ते ३२० रु., पावटा ३७ पि.- ४०० ते ७०० रु., दुधी ३ पि.- ८० ते १२५ रु., तोंडली २६९ पि.- २०० ते ४६० रु., तूर ६४ पि.- ३०० रु. ते ५१० रु., शेवगा १३ पि.- ४० ते ८० रु., सिमला ७९ पि.- १५० ते २३० रु., भेंडी ४४ पि.- २५० ते ३७० रु., भुईमूग शेंग ३३० ते ४८०रु, वाटाणा - ३३२ पि.- २०० ते ४०० रु. (वार्ताहर)

Web Title: 12 thousand onion bags coming in Outer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.