शिरुर तालुक्यातील १२ गावे प्रतिबंधित क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:23+5:302021-04-02T04:11:23+5:30
शेख म्हणाल्या, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा १४, शिरसगाव काटा १२, न्हावरे ३५, आंबळे ६, चिंचणी १०, आंधळगाव ११, निमोणे ...
शेख म्हणाल्या, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा १४, शिरसगाव काटा १२, न्हावरे ३५, आंबळे ६, चिंचणी १०, आंधळगाव ११, निमोणे ९, टाकळी हाजी १६, आमदाबाद ९, निमगाव म्हाळुंगी १५, पाबळ १४, जातेगाव बुद्रुक १६ सक्रीय रुग्ण आहेत. या बारा गावात कोरोना विषाणूचा संसर्ग व पादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाय योजना आखणे आवश्यक असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या आदेशान्वये ही गावे प्रतिबंधित क्षेत्र व या गावांचे केंद्रस्थानी धरून पाच किलोमीटरचा परिसर हा बफर क्षेत्र म्हणून सात दिवसांसाठी घोषित करण्यात आला आहे.
सदर बारा गावात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सात दिवसासाठी ३ एप्रिल ते ९ एप्रिल पर्यंत घोषित करण्यात आले असून या कालावधीत फक्त अत्यावश्यक बाबी म्हणून किराणा दुकाने, वैद्यकीय आस्थापना, दूध संकलन केंद्र, बँका व खताची दुकाने चालू राहतील. या काळात शेती विषयक सर्व कामे सामाजिक अंतराचे निकष पाळून सुरू राहतील.