शिरुर तालुक्यातील १२ गावे सात दिवसांसाठी प्रतिबंधीत क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:11 AM2021-04-10T04:11:36+5:302021-04-10T04:11:36+5:30
शिरुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन कोरोनाने हाहाकार माजविला असून छोट्या गावांमध्ये सर्रास कोरोनाचे रुग्न आढळू लागले आहेत. तालुक्यातील वढु ...
शिरुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन कोरोनाने हाहाकार माजविला असून छोट्या गावांमध्ये सर्रास कोरोनाचे रुग्न आढळू लागले आहेत. तालुक्यातील वढु बुद्रुक, पाबळ, मांडवगण फराटा , न्हावरा , शिरसगाव काटा , आंबळे , आंधळगाव , निमोणे , निमगाव म्हाळुंगी , पिंपरी दुमाला, ढोक सांगवी, तर्डोबाची वाडी या बारा गावांमध्ये ३४८ कोरोना बाधीत रुग्न आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार एका संक्रमीत रुग्नाकडून दुस-या व्यक्ती संपर्कात आल्याने प्रसार होत असल्याने कोरोनाचा गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने तालुक्यात मोठ्या गावांसह छोट्या गावातही रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर तात्काळ नियंत्रण मिळवून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने दि. १२ एप्रील पासुन १८ एप्रील पर्यंत किराणा दुकान , दवाखाने , मेडिकल , दुध संकलन केंद्र , बँका , खताची दुकाने व शेती विषयक सर्व कामे सामाजीक अंतराचे निकष पाळूण सुरु राहतील व अन्य सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश संतोषकुमार देशमुख यांनी दिले आहे.
--
बॅंक अधिकाऱ्यांवरही कारवाई करू : देशमुख
भाजीपाला व बँकांमध्ये सामाजीक अंतर पाळा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावोगावच्या ठिकाणी भाजी मंडईसह बँकांमध्ये सामाजीक अंतर पाळत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भाजीमंडई मध्ये सामाजीक अंतर न पाळल्यास भाजी मंडई बंद करण्याबरोबरच ज्या बँकांमध्ये सामाजीक अंतर पाळत नसेल त्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक : ०९कोरेहाव भीमा प्रतिबंध क्षेत्र
फोटो : कोरोगाव भीमा (ता.शिरुर) येथे भाजीमंडई मधील भाजी विक्रेत्यांना सामाजीक अंतर पाळण्याचे आवाहन करताना प्रांताधिकारी संतोएकुमार देशमुख व इतर