Pune Crime: १२ वर्षीय मुलीला पळवले, तरुणावर पॉक्सोचा गुन्हा; वडगाव शेरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 09:55 IST2024-01-02T09:54:47+5:302024-01-02T09:55:15+5:30
ही घटना वडगाव शेरी येथील वडेश्वर नगरमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली...

Pune Crime: १२ वर्षीय मुलीला पळवले, तरुणावर पॉक्सोचा गुन्हा; वडगाव शेरीतील घटना
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला (वय १२) फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणाला पाेलिसांनी अटक केली. अनिकेत अंबादास कांबळे (१८, रा. मु. पो. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. नगर) असे या तरुणाचे नाव आहे.
ही घटना वडगाव शेरी येथील वडेश्वर नगरमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी आराेपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन १२ वर्षांची मुलगी ही शुक्रवारी (दि. २९) सकाळी वही आणण्यासाठी दुकानात जाते, असे सांगून घरातून गेली होती. आरोपी अनिकेत कांबळे याने फिर्यादी यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून जेजुरी येथे पळवून नेले. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अनिकेत कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पालवे करत आहेत.