पुणेकरांसाठी खुशखबर ; खडकवासला धरणात पावसाची दमदार बॅटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 08:49 PM2019-07-08T20:49:36+5:302019-07-08T20:52:54+5:30

गेल्या चाेवीस तासात खडकवासला धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने 1.21 टिएससी पाण्याची वाढ झाली आहे.

1.21 tmc water collected in khadakwasla dam in just 24 hrs | पुणेकरांसाठी खुशखबर ; खडकवासला धरणात पावसाची दमदार बॅटींग

पुणेकरांसाठी खुशखबर ; खडकवासला धरणात पावसाची दमदार बॅटींग

googlenewsNext

पुणे : दाेन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये 24 तासांमध्ये 1.21 टिएमसी पाणी जमा झाले आहे. सध्या खडकवासला धरण 61.51 टक्के भरले आहे. त्यामुळे येत्या दिवसात असाच पाऊस पडत राहिला तर धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरक्षेत्रात देखील जाेरदार पावसाच्या सरी काेसळत आहेत. पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. सध्या हे धरण 61.51 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे या धरणात 1.21 टिएमसी पाणीसाठी जमा झाला आहे. 24 तासात 42 मिलीमीटर इतका पाऊस खडकवासला धरण क्षेत्रात झाला आहे. रविवारी धरणातील पाणीसाठी 44.50 टक्के इतका हाेता. ताे साेमवारी 61.51 टक्के इतका झाला.  

साेमवार वाहतूक काेंडीचा 
जून काेरडा गेल्याने पुणेकर पावसाची आतुरतेने वाट पाहत हाेते. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने पुण्यात जाेरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर मुसळधार पाऊस शहरात काेसळत आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. साेमवारी दिवसभर शहरातील सर्वच भागात वाहतूक काेंडी झाली हाेती. नागरिक पावसापासून बचावासाठी चारचाकीचा वापर करत असल्याने रस्त्यांवरील चारचाकींचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यातच अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक काेंडीत भरच पडत आहे. 

Web Title: 1.21 tmc water collected in khadakwasla dam in just 24 hrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.