Pune Corona News: शहरात शुक्रवारी १२५ कोरोनाबाधित; तर १५५ बरे होऊन सुखरूप घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 10:07 PM2021-10-08T22:07:06+5:302021-10-08T22:07:14+5:30
विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ५२५ संशयितांची तपासणी करण्यात आली
पुणे : शहरात शुक्रवारी १२५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ५२५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.४६ टक्के इतकी आढळून आली आहे. शहरात १ हजार ५५० सक्रिय रुग्ण आहेत. तर, दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १८७ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २२५ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३४ लाख २५ हजार ५२८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख २ हजार २२६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ९१ हजार ६२७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.