भोरमध्ये ६६५ जागांसाठी १२५५ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:13 AM2020-12-31T04:13:01+5:302020-12-31T04:13:01+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ६६५ जागांसाठी १२५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.त्यामुळे निवडणुकीतील चुरस ...
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ६६५ जागांसाठी
१२५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली असुन ४ जानेवारीला माघारीनंतरच चिञ स्पष्ट होणार आहे.
भोर तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीची निवडणुक लागल्या असुन ७० ग्रामपंचायती ३ प्रभागाच्या तर ३ ग्रामपंचायती ४ प्रभागाच्या आहेत.तर ४९ ग्रामपंचायतीत प्रयेकी ७ सदस्या प्रमाणे ४४३ सदस्य निवडले जाणार असुन २१ ग्रामपंचायतीत प्रत्येकी ९ सदस्याप्रमाणे १८९ सदस्य तर ३ ग्रामपंचायतीत प्रत्येकी ११ प्रमाणे ३३ सदस्य असे एकुण ६६५ सदस्य निवडले जाणार आहे.त्यानंतर सदस्या मधुन सरपंचांची निवड केली जाणार आहे.माञ उमेदवारी अर्ज भरायच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकुण १२५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.अनेक इच्छुकांमुळे काँग्रेस,राष्ट्रवादी शिवसेना आणी भाजप हे विविध पक्ष निवडणुकीत उतरल्याने गावागावात चुरस वाढली आहे.त्यामुळे निवडणुका बिनविरोध होतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.माञ माघारी नंतरच चिञ स्पष्ट होणार आहे.