हवेली तालुक्यात १२७ बाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:53+5:302021-03-20T04:11:53+5:30
तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या १२७ बाधितांमुळे एकूण रूग्णसंख्या १८ हजार ६१ झाली आहे. ...
तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या १२७ बाधितांमुळे एकूण रूग्णसंख्या १८ हजार ६१ झाली आहे. तर ७५ कोरोनामुक्तांमुळे कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांची एकून संख्या १६ हजार ९६० झाली आहे. आज २ जण मृत्यूमुखी पडले त्यामुळे आजअखेर एकूण मयतांची संंख्या ३५६ झाली आहे. मृत्यूदर १.९७ टक्के आहे. आज ७४७ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी ६ जण अत्यावस्थ आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ . ९० टक्के आहे.
तालुक्यातील गावनिहाय उपचार घेत असलेले कोरोना बाधित रूग्ण पुढीलप्रमाणे - वरदाडे गो-हे खुर्द, गुजर निंबाळकरवाडी, कोंंढणपूर, कल्याण, भिलारवाडी, नायगांव, न्यू कोपरे, शिंदवणे प्रत्येकी १, वडाची वाडी, श्रीरामनगर, कुुुडजे, कोरेगाव मुळ, टिळेकरवाडी, खडकवासला, फुुुुुरसुंगी, शिरसवडी,
अष्टापूर, सांगवी सांडस प्रत्येकी २, वळती, मांजरी खुर्द, भिवरी, डोणजे, मांगडेवाडी, फुलगांव, वढू खुर्द प्रत्येकी ३, आळंदी म्हातोबाची, खानापूर प्रत्येकी ५, पेरणे, बकोरी प्रत्येकी ७, कुंजीरवाडी, कोलवडी प्रत्येकी ८, कोंढवे धावडे ९, सोरतापवाडी १०, खेड शिवापूर ११, किरकटवाडी १५, आव्हाळवाडी १८, केसनंद २१, कदमवाकवस्ती ३३, देहू ३५, मांजरी बुद्रुक ३८, लोणी काळभोर ४४, नांदेड ५३, न-हे ७२, वाघोली २११