बारावीची परीक्षा २३ तर दहावीची २९ एप्रिलपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:14 AM2021-02-27T04:14:39+5:302021-02-27T04:14:39+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी यंदाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) ...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी यंदाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) येत्या २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत घेतली जाणार आहे.
दहावी-बारावी परीक्षेचे सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दरम्यान, संकेतस्थळावरील वेळापत्रक फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा-महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात दिले जाणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा सोशल मीडियातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळवले आहे.