Pune | बिबट्याच्या हल्ल्यात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; ४ दिवसांपूर्वीच दिला होता शेवटचा पेपर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 04:22 PM2023-03-18T16:22:19+5:302023-03-18T16:22:19+5:30

ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली...

12th student dies in leopard attack; The last paper was given four days ago | Pune | बिबट्याच्या हल्ल्यात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; ४ दिवसांपूर्वीच दिला होता शेवटचा पेपर

Pune | बिबट्याच्या हल्ल्यात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; ४ दिवसांपूर्वीच दिला होता शेवटचा पेपर

googlenewsNext

डेहणे (पुणे) : धुवोली (ता. खेड) येथे अजय चिंतामण जठार (वय १७) या बारावीच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून, अजयने चार दिवसांपूर्वीच वाणिज्य शाखेचा शेवटचा पेपर दिला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अजय जठार हा आपला मित्र साई वाळुंज याच्यासोबत शुक्रवारी सायंकाळी सात वाजता रानात जनावरे घरी परत आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अजयवर अचानक हल्ला केला. साईच्या समोरच हा हल्ला झाल्याने त्याने स्वतःला सावरत धीराने बिबट्याच्या दिशेने दगड मारला. बिबट्याने अजयच्या मानेला धरून फरफटत जाळीमध्ये नेले. साईने त्याही परिस्थितीत बिबट्याच्या मागे पळत जाऊन जाळीत असलेल्या बिबट्याच्या दिशेने दगड मारल्याने बिबट्या पळून गेला; परंतु तोपर्यंत मानेवर इजा झाल्याने अजयचा जागीच मृत्यू झाला होता.

साईचा आरडाओरडा ऐकून गावकरी घटनास्थळी आले. दरम्यान, भिवेगाव येथील बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता धुवोली येथे अशीच घटना घडल्याने बिबट्याच्या हल्ल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Web Title: 12th student dies in leopard attack; The last paper was given four days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.