बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हाॅलतिकिट; शाळा, महाविद्यालयात साेमवार पासून वाटप

By प्रशांत बिडवे | Published: January 19, 2024 07:25 PM2024-01-19T19:25:43+5:302024-01-19T19:28:07+5:30

हॉल तिकिटांमध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात

12th students will get online hall ticket Distribution in schools colleges from Monday | बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हाॅलतिकिट; शाळा, महाविद्यालयात साेमवार पासून वाटप

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हाॅलतिकिट; शाळा, महाविद्यालयात साेमवार पासून वाटप

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी साेमवार दि. २२ राेजी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले हॉल तिकीट विद्यार्थ्यांना द्यावेत. तसेच हॉल तिकीटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी / मार्च महिन्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन हाॅल तिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हॉल तिकीट ओपन करताना काही त्रुटी आढळून आल्यास हॉल तिकीट गुगल क्रोम मध्ये ओपन करावे. हॉल तिकीट विद्यार्थ्यांना प्रिंट करून देताना त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये. तसेच हॉल तिकीटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

हॉल तिकिटावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा हॉल तिकीट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्याकडे हॉल तिकीट द्यावे, असेही राज्य मंडळाच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

विभागीय मंडळातून करून घ्याव्यात दुरूस्त्या

हॉल तिकिटांमध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. हॉल तिकिटावरील फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव यासंदर्भातील दुरुस्ती शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी.

Web Title: 12th students will get online hall ticket Distribution in schools colleges from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.