वनराज आंदेकरांवर अचानक हल्ला करणारे १३ आरोपी अटकेत; ताम्हिणी घाटातून पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:02 PM2024-09-03T19:02:28+5:302024-09-03T19:04:28+5:30

बेसावध आंदेकर गप्पा मारत थांबले असताना सहा दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी आंदेकरला घेरलं आणि त्यांच्यावर बंदूक, कोयते घेऊन हल्ला केला होता

13 accused who suddenly attacked Vanraj Andekar arrested The police took custody from the tamhini ghat | वनराज आंदेकरांवर अचानक हल्ला करणारे १३ आरोपी अटकेत; ताम्हिणी घाटातून पोलिसांनी घेतले ताब्यात

वनराज आंदेकरांवर अचानक हल्ला करणारे १३ आरोपी अटकेत; ताम्हिणी घाटातून पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : पुण्यात रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भावासोबत थांबला होते. बेसावध आंदेकर गप्पा मारत थांबले असताना सहा दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी आंदेकरला घेरलं. आणि त्यांच्यावर हल्ला करून खून केला. हा सर्व थरार जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्या १३ आरोपीना पोलिसांनी ताम्हिणी घाटातून अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी या खूनप्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली होती.

वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कौटुंबिक वादातून खून झाल्याची शक्यता दिसत आहे.  मात्र, यामागे टोळी वर्चस्वही असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यातील एक आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड हा आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी आहे. त्याची स्वत:ची टोळी असून, तो मोक्कातून जामिनावर बाहेर पडला आहे. स्वतः सोमनाथ आणि टोळीतील काही सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवर होते.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. नाना पेठेसारखा गजबजलेला भागात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एरवी मित्रांच्या गराड्यात असणारा वनराज रविवारी मात्र चुलत भावासोबत थांबला होता. जवळच त्याचं घर होतं. आणि घरापासून चालत चालत तो मुख्य रस्त्या लागत असणाऱ्या चौकात आला होता. हल्लेखोर त्याची वाट पाहत दबा धरूनच बसले होते. मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येताच ६ दुचाकी त्याच्या दिशेने धावल्या. सुरुवातीला एकाने आंदेकरवर गोळ्या झाडल्या. एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या त्याच्यावर झाडल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने वनराज आंदेकर गडबडला. त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्यानेही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले पाहून नंतर मारेकर्‍यांनी पळ काढला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती. मात्र समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तब्बल 13 जण या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. कौटुंबिक कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आता १३ जणांना ताब्यात घेतल्यावर पुणे पोलीस लवकरच घटनेचा तपास पूर्ण करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Web Title: 13 accused who suddenly attacked Vanraj Andekar arrested The police took custody from the tamhini ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.