लोणी काळभोरला १३ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:54 PM2018-10-05T23:54:01+5:302018-10-05T23:56:33+5:30
पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास खलसे व त्यांचे दाजी अक्षय शिवा ते दोघे खलसे यांची बहिणीकडे नायगाव येथे दुचाकीवरून निघाले.
लोणी काळभोर : घरासमोरून गेला या कारणांवरून दोघांना जातीवाचक शब्द वापरून व त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी १३ जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील खलसे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये विकास हौशीराम निगडे, भाऊसाहेब हौशीराम निगडे, भाऊसाहेब यांची पत्नी व आई (पूर्ण नाव माहीत नाही.) यांच्यासमवेत इतर ७ ते ८ (सर्व रा. निगडेवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) अशा अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास खलसे व त्यांचे दाजी अक्षय शिवा ते दोघे खलसे यांची बहिणीकडे नायगाव येथे दुचाकीवरून निघाले. ते निगडेवस्ती येथून जात असताना भाऊसाहेब यांच्या घरासमोर आले असता त्यांनी मोबाइलमध्ये त्यांचे शूटिंग करत होते. या प्रकरणी गाडी थांबवून खलसे यांनी विचारणा केली असता निगडे याने जातीवाचक शब्द वापरून शिविगाळ केली. याचा खलसे यांना राग आल्याने दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर निगडे याने दुचाकी ओढल्याने खलसे व त्यांचे दाजी खाली पडले. निगडे यांनी हात व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व आवाज देऊन घरांतील लोकांना बोलावले. विकास निगडे, भाऊसाहेब निगडे यांची आई व पत्नी आणि त्यांच्यासमवेत ७ ते ८ अनोळखी इसम आले. त्या सर्वांनी दोघांना दगड व काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या तावडीतून दोघे कसेबसे सुटले. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना खलसे यांनी नातेवाईकांना फोन केला. तेव्हा त्यांना मारहाण करणारे त्यांच्या घराकडे जाऊन त्यांची अल्टो कार (एमएच १२, ईएम ८०८७) पेटवून दिली आहे, असे सांगितले. तसेच ते पोलीस ठाण्यात पोहोचले नंतर त्यांची बहिण आशा भुजंग लोंढे तेथे आली व तिने विकास निगडे व काकासाहेब गाढवे यांनी हात धरून विनयभंग केला व लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आहे, असे सुनील खलसे यांना सांगितले. पुढील तपास हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड हे करत आहेत.