दागिने बनविण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सला १३ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:15 AM2020-12-05T04:15:06+5:302020-12-05T04:15:06+5:30
पुणे : सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने कारागिराने ज्वेलर्स व्यवसायिकाकडून तब्बल १२ लाख ९२ हजारांचे दागिने घेऊन पळ ...
पुणे : सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने कारागिराने ज्वेलर्स व्यवसायिकाकडून तब्बल १२ लाख ९२ हजारांचे दागिने घेऊन पळ काढला. ही घटना रविवार पेठेतील दुकानात घडली.
अकबर उर्फ अतर रफिक मलिक (वय ३६ )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत घोरपडे( रा. शुक्रवार पेठ, सातारा ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत यांचा ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडील सोने घेऊन दागिने बनविण्याचे काम अकबर काही महिन्यांपासून करीत होता. त्यामुळे अभिजीतचा अकबरवर विश्वास होता. काही महिन्यांपूर्वी अकबरने दागिने बनविण्याच्या हेतूने अभिजीत यांच्याकडून ३६३ ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन परत न देता १२ लाख ९२ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी दिली.