पेट्रोल पंपावर जमा झालेली १३ लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:09 AM2021-09-25T04:09:52+5:302021-09-25T04:09:52+5:30
पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेली १२ लाख ९५ हजारांची रोकड व्यवस्थापकाने लांबविल्याचा प्रकार मुंढवा परिसरातील एका पेट्रोल पंपावर ...
पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेली १२ लाख ९५ हजारांची रोकड व्यवस्थापकाने लांबविल्याचा प्रकार मुंढवा परिसरातील एका पेट्रोल पंपावर उघडकीस आला आहे.
याप्रकरणी व्यवस्थापक श्रीहरी दामू बंडगर (वय ३०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंपाचे मालक श्रीनिवास जगताप (वय २६, रा. पद्मावती) यांनी यासंदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जगताप यांच्या मालकीचा मुंढवा परिसरात सिद्धार्थ पेट्रोल पंप आहे. पंपावर चौदा कामगार असून तीन व्यवस्थापक काम करतात. आरोपी बंडगर जगताप यांच्या पेट्रोल पंपावर गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. पंपावरील उधारीची रक्कम जमा झालेली होती. याबाबतची नोंद संगणकावर करण्यात आली होती. बंडगर याने संगणकीय नोंदीत फेरफार केला. उधारीपोटी जमा झालेली १२ लाख ९५ हजार ३३३ रुपयांची रोकड गल्ल्यात ठेवण्यात आली होती. बंडगरने या रकमेचा अपहार केला. गल्ल्यातील रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर जगताप यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. रोकड लांबवून जगताप पसार झाल्याचे निदर्शनास आले असून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने तपास करत आहेत.