यवत गावात १३ कोरोना रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:41+5:302021-03-19T04:11:41+5:30
यवत परिसरातील अनेक गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरू लागली असून यवत गावात मागील दोन दिवसांत १३ कोरोना रुग्णांची भर पडली ...
यवत परिसरातील अनेक गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरू लागली असून यवत गावात मागील दोन दिवसांत १३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
यवत ग्रामीण रुग्णालयात दिण१६ व दि.१७ रोजी घेतलेल्या २०३ पैकी ४९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिली. बधितांपैकी २७ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे.
गावाचे नाव व बाधित रुग्णांची संख्या यवत - १३, केडगाव - ९, वरवंड -२ , पारगाव - ४, राहू - ५, पाटस - १, कासुर्डी - ४, खामगाव - ३, देलवडी - १, सोरतापवाडी (ता. हवेली) -२, देऊळगाव गाडा - १, वाळकी - १, गलांडवाडी - १, माळवाडी - १, उरुळी कांचन - १ दरम्यान, यवत ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले कोविड सेंटर आताच पूर्ण क्षमतेने भरू लागले असून वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मागील वर्षी प्रमाणेच यंदाही उपचारासाठी अडचणींना सामोरे जावे लागू शकते.