भोरमध्ये १३ नवे कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:21 AM2021-03-13T04:21:01+5:302021-03-13T04:21:01+5:30
भोर वार्ताहर भोर शहरात आज ६ तर व ग्रामीण भागात ७ असे १३ तर नवे रुग्ण सापडले असून सध्या ...
भोर वार्ताहर
भोर शहरात आज ६ तर व ग्रामीण भागात ७ असे १३ तर नवे रुग्ण सापडले असून सध्या ५३ जणांवर उपचार सुरु आहेत.
तालुक्यात आजपर्यंत एकूण कोरोनाग्रस्त २० हजार १५२ जणांना उपचारानंतर घरी सोडलेले २०२० जण आहेत. तर स्वॅब तपासलेले १२ हजार १३६ जण आहेत. त्यामुळे नागरिकांनी गांभिर्याने घेणे महत्त्वाचे असून प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात भोर शहरात व ग्रामीण भागातील गावात कोरोना पॉझिटिव्ह वाढत गेले आहेत
भोर शहरात आज ६ तर आंबाडे एक, सारोळा एक, नसरापूर एक, पोम्बर्डी एक, तांभाड एक, कामथडी एक, काळेवाडी असे एकूण १३ जण नवे रुग्ण सापडले आहेत.
एकीकडे कोरोना दिवसेंदिवस वाढत असतानाही नागरिक फारसी काळजी घेताना दिसत नाहीत. दुकानात, आठवडे बाजारासह सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे प्रशासन सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करत आहेत. त्यामुळे मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भोर नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी होत असून भोर शहरासह ग्रामीण भागातील गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे भोर प्रशासनाकडून विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना दिवसेंदिवस दिवस वाढ होऊ शकते. याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.
नागरिकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करता विनामास्क आणि विनाकारण घराबाहेर पडून फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले.