Purushottam Karandak: पुरुषोत्तम करंडकासाठी नव्याने १३ संघांची निवड; एकूण ५१ महाविद्यालये स्पर्धेसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:35 PM2024-07-16T12:35:03+5:302024-07-16T12:35:53+5:30
नव्याने दाखल झालेल्या ३३ संघांमधून १३ संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी ५१ संघांची निवड सोमवारी (दि. १५) निश्चित करण्यात आली. नव्याने दाखल झालेल्या ३३ संघांमधून १३ संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली आहे.
स्पर्धेचे अर्ज वाटप दि. १४ व १५ जुलै रोजी करण्यात आले. या दोन दिवसांत एकूण ३३ संघांनी अर्ज दाखल केले होते. गेल्यावर्षीच्या स्पर्धेतील ४१ पैकी ३८ संघांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची स्वीकृती दि. ३ व ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात शनिवार पेठेतील नातू वाडा येथे होणार आहे. आतापर्यंत ज्या संघांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यापैकी कुणीही या दिवशी गैरहजर राहिल्यास इतर संघांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली.
स्पर्धेचे वेळापत्रक
दि. ७ ऑगस्ट रोजी लॉटस : स्थळ : इंदिरा मोरेश्वर सभागृह, डीएसके चिंतामणी
दि. १६ ते ३० ऑगस्ट : पुणे केंद्राची प्राथमिक फेरी
दि. २१ व २२ सप्टेंबर : पुणे केंद्राची अंतिम फेरी
दि. २८ सप्टेंबर : पुणे केंद्राचा पारितोषिक वितरण समारंभ
चिठ्ठीद्वारे निवडलेले महाविद्यालयीन संघ
- एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर
- सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग
- एन. बी. एन. सिंहगड टेक्निकल इस्टिट्यूट, कॅम्पस आंबेगाव बुद्रुक
- इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हिंजवडी
- विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, इंदापूर
- कावेरी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे
- डी. वाय. पाटील युनिटेक बी. स्कूल, ताथवडे
- नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे
- पी. डी. ई. ए. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
- एम. आय. टी. डब्ल्यू. पी. यू., पुणे
- अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, लोहगाव
- डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी, बी. स्कूल, ताथवडे
- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, ऑटोनॉमस, पुणे