चिनी मांजा बाळगल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 05:29 AM2018-02-15T05:29:35+5:302018-02-15T05:29:44+5:30
चिनी मांजा बाळगल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी ६ पोलीस ठाण्यात १० गुन्हे बुधवारपर्यंत दाखल झाले आहेत,
पुणे : चिनी मांजा बाळगल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी ६ पोलीस ठाण्यात १० गुन्हे बुधवारपर्यंत दाखल झाले आहेत़
चिनी नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा मुजुमदार यांचे रविवारी निधन झाले़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना चिनी मांजाची विक्री करणाºयांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले होते़ गुन्हे शाखेने चिनी मांजा बाळगणाºयांचा शोध घेण्यासाठी ७ पथके तयार केली होती़
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने वाकड येथील दोन व्यापाºयांना पकडून त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले होते़ त्यानंतर शहरातील वारजे, खडक, कोथरूड, स्वारगेट, वाकड, येरवडा या पोलीस ठाण्यांत आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले असून, १३ आरोपींवर हे गुन्हे दाखल
करण्यात आले असल्याची
माहिती सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी दिली़
कोथरूड, स्वारगेट, वाकड, येरवडा या पोलीस ठाण्यांत प्रत्येकी २ गुन्हे दाखल असून वारजे, खडक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे़
आतापर्यंत या १० गुन्ह्यांत एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे़ शहरात चिनी मांजा विकणारे विक्रेते व चिनी मांजाचा वापर करून पतंग उडविणाºयांचा पोलीस शोध घेत आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सांगितले, की नदीपात्रात पतंग उडविणाºया मुलांना पकडून आपण त्यांच्याकडील मांजाची तपासणी केली; परंतु त्यांच्याकडे साधा मांजा होता़ असे पतंग उडविणाºया ९ मुलांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या पालकांना बोलावून नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे़
चिनी मांजामुळे एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण होत
असेल, तर मुंबई पोलीस अॅक्ट
१८८ नुसार पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे़
या गुन्ह्यात ६ महिन्यांपर्यंत कारावास आणि १ हजार रुपये दंडाची
शिक्षा होऊन शकते़ त्यामुळे पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़
चिनी मांजासंदर्भात महापालिकेत बैठक
चिनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर कायद्याने बंदी असताना सध्या सर्रास सर्वत्र त्यांची विक्री होत आहे. याची महापौर मुक्ता टिळक यांनी गंभीर दखल घेतली असून, शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजता महापालिकेच्या सभागृहात संबंधित सर्व यंत्रणेच्या अधिकाºयांची बैठक आयोजित केली आहे.
पुण्यातल्या भरगर्दीच्या शनिवारवाड्यासमोरच्या रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये आॅफिसमधून घरी जाताना कटलेला पतंगच्या मांजाने महिलेचा गळा कापला गेला. चिनी नायलॉन मांजाविक्रीवर कायद्याने बंदी आहे, तरीही विक्री सुरू आहे. याबाबत तातडीने कडक उपाय-योजना करण्यासाठी पोल्ीास, महापालिका अधिकारी, पतंगप्रेमी नागरिक यांची शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात येणार आहे.