मोठी बातमी! संतोष जाधव टोळीकडून १३ पिस्तुले हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:44 PM2022-06-18T15:44:20+5:302022-06-18T15:48:55+5:30

पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई....

13 pistols seized from Santosh Jadhav gang pune latest crime news | मोठी बातमी! संतोष जाधव टोळीकडून १३ पिस्तुले हस्तगत

मोठी बातमी! संतोष जाधव टोळीकडून १३ पिस्तुले हस्तगत

googlenewsNext

पुणे : जुन्नर तालुक्यातील एका व्यावसायिकाला संतोष जाधव याने व्हाॅटसॲप कॉल करुन ५० हजार रुपयांची खंडणी दिली नाही तर गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष जाधव याला अटक केल्यानंतर हा प्रकाराची माहिती या व्यावसायिकाने दिली असून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संतोष जाधव याच्या टोळीतील ७ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १३ पिस्तुले, मोबाईल जप्त केले आहेत. जीवनसिंग दर्शनसिंग नहार (वय २३, रा. मंचर, श्रीराम रमेश थोरात (वय ३२, रा. मंचर), जयेश रतिलाल बहिराम (वय २४, रा. घोडेगाव), वैभव ऊफर् भोला शांताराम तिटकारे (वय १९, रा. जळकेवाडी, चिखली), रोहीत विठ्ठल तिटकारे (वय २५, रा. सरेवाडी, नायफड), सचिन बबन तिटकारे (वय २२, रा. धाबेवाडी, नायफड), जिशान इलाई बक्श मुंढे (वय २०, रा. घोडेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जयेश बहिराम (५ गावठी पिस्तुल, १ मोबाई), रोहीत तिटकारे (३ पिस्तुल, १ मॅक्झीन, १ बुलेट कॅरयर), व इतरांकडून प्रत्येकी एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके उपस्थित होते.
संतोष जाधव याने ५ ते ६ महिन्यांपूर्वी या व्यावसायिकाला व्हॉटसॲप कॉल करुन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. हप्ता दिला नाही तर गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २४ मे रोजी संतोष जाधव याने पुन्हा एकदा कॉल करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र घाबरुन त्यांनी कोठेही वाच्यता केली नव्हती. पोलिसांनी संतोषला पकडण्यावर त्यांनी ही माहिती सांगितली.

संतोष जाधव याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने जयेश व मनवर यांना मध्य प्रदेशात पाठवून तेथून गावठी पिस्तुलाचा साठा आणण्यास पाठविले होते. त्यानंतर पोलिसांनी नहार, थोरात व त्यानंतर एका ऐकाला अटक करुन त्यांच्याकडून ही शस्त्रे हस्तगत केली. नहार, थोरात व अल्पवयीन मुलगा यांना खंडणीची रक्कम आणण्यासाठी पाठविण्याचा कट रचला होता.

हरियाणाला पाठविली जाणार होती-
ही शस्त्रात्रे मुसेवाला हत्याकांडानंतर आणण्यात आली आहेत. मध्य प्रदेशातून ही पिस्तुले आणण्यात आली असली तरी त्याच्याबरोबर गोळ्या आणण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या पिस्तुलांचा उपयोग काय, कशासाठी आणली होती असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा ही पिस्तुले हरियानाला पाठविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या टोळीतील अनेकांवर यापूर्वी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणीपासून चोरीचे गुन्हे आहेत.
ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, नेताजी गंधारे, किरण भालेकर, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सनिल धनवे, विनोद दुर्वे, हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, महेश बनकर, जनार्दन शेळके, अतुल डेरे, अजित भुजबळ, कारंडे, शेख, दत्तात्रय तांबे, विक्रम तापकीर, गुरु जाधव, सहायक फौजदार पंदारे, पठाण, धनंजय पालवे, शैलेश वाघमारे, सचिन कोबल, नवीन अरगडे यांच्या पथकाने केली.

संतोष जाधव अथवा त्याच्या त्याने कोणी खंडणीची मागणी केली असल्यास अथवा इतर काही तक्रार असल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी.

-डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

Web Title: 13 pistols seized from Santosh Jadhav gang pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.