ओतूर उपबाजार आवारात १३ हजार ७६४ कांदापिशवी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:27+5:302021-05-31T04:09:27+5:30

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार येथे रविवारी १३ हजार ७६४ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार नं. ...

13 thousand 764 onion bags arrived at Ootur sub-market premises | ओतूर उपबाजार आवारात १३ हजार ७६४ कांदापिशवी आवक

ओतूर उपबाजार आवारात १३ हजार ७६४ कांदापिशवी आवक

Next

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार येथे रविवारी १३ हजार ७६४ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार नं. १ गोळा कांद्यास १० किलोस १९० रुपये ते २११ रुपये बाजारभाव मिळाला. गुरुवारपेक्षा प्रतवारीनुसार १० किलोमागे १० रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे, कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.

रविवारी प्रतवारीनुसार १० किलोचे बाजारभाव : कांदा नं. १ ( गोळा ) १९० रुपये ते २११रुपये .

कांदा नं. २( सुपर )-१५० रुपये ते १९० रुपये .

कांदा नं. ३( गोल्टा )-१०० रुपये ते १५० रुपये .

कांदा नं. ४-(गोलटी / बदला )-५० रुपये ते १००रुपये.

बटाटा बाजारभाव: रविवारी फक्त ४८ बटाटा व लसूण २ पिशव्या आवक झाली. बटाटा १० किलोस प्रतवारीनुसार ७० रुपये ते १६० रुपये व लसणास १० किलोस प्रतवारीनुसार १५० रुपये ते२१२ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती ़ओतूर मार्केट कार्यालयप्रमुख दीपक मस्करे यांनी दिली .

Web Title: 13 thousand 764 onion bags arrived at Ootur sub-market premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.