अश्लील व्हिडीओ दाखवून १३ वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य, औंध परिसरातील धक्कादायक घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: May 25, 2024 04:30 PM2024-05-25T16:30:26+5:302024-05-25T16:32:18+5:30
आरोपीने त्याच्या मोबाइलमध्ये असलेले अश्लील व्हिडीओ पीडितेला दाखविले, तसेच तिच्या छातीला आणि मांडीला हात लावून सोबत अश्लील कृत्य केले....
पुणे : औंध परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीवर अश्लील व्हिडीओ दाखवत अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रभू प्रल्हाद भालेराव (वय ४०, रा.डीपी रस्ता, औंध) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हा प्रकार २४ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला घरामध्ये बोलावून घेतले. त्यानंतर, आरोपीने त्याच्या मोबाइलमध्ये असलेले अश्लील व्हिडीओ पीडितेला दाखविले, तसेच तिच्या छातीला आणि मांडीला हात लावून सोबत अश्लील कृत्य केले.
मुलीने तेथून पळून जाऊन घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपी प्रभू याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केंद्रे हे करत आहेत.