जिल्ह्यातील कोविड सेंटरला १३३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:13+5:302021-05-08T04:12:13+5:30
कोविड केअर सेंटरमधील ३५ रुग्णसंख्या मागे एक याप्रमाणे या १३३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि ...
कोविड केअर सेंटरमधील ३५ रुग्णसंख्या मागे एक याप्रमाणे या १३३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ६६ कोविड केअर सेंटर आहेत. या सेंटरमध्ये चार हजार सहाशे चार रुग्ण दाखल असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अनेकदा केअर सेंटरमधील रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यांना कोविड रुग्णालयांमध्ये हलवण्यास उशीर होतो. तातडीची गरज म्हणून त्यांना या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमार्फत ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकेल, असे काकडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेला स्वयंसेवी संस्था आणि सीएसआरमधून ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर मिळालेले आहेत. दाखल रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात त्याचे वाटप करण्यात आले असून आणखीन ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध झाल्यास त्याचे देखील वाटप जिल्हा परिषदेच्या कॉमेडी केअर सेंटरला केले जाणार आहे.