मृद व जलसंधारण विभागाकडून तालुक्यासाठी १३.५० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:58+5:302021-02-17T04:14:58+5:30
: इंदापूर तालुक्यात नवीन पन्नास बंधारे बांधणार लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : मृद व जलसंधारण विभागाकडून इंदापूर तालुक्यासाठी ५० ...
: इंदापूर तालुक्यात नवीन पन्नास बंधारे बांधणार
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : मृद व जलसंधारण विभागाकडून इंदापूर तालुक्यासाठी ५० नवीन बंधारे व २ बंधाऱ्यांची दुरुस्तीसाठी एकूण १३.५० कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणे म्हणाले, पावसाळ्यामध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी अडविले जावे, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये विहिरीचे पाणी कमी होणार नाही. तसेच जिरायत शेतीचे रुपांतर बागायत शेतीमध्ये व्हावे, याकरिता नवीन बंधाऱ्यांची मागणी होती. निरगुडे (गावठाण), निमसाखर या २ ठिकाणचे जुने बंधारे दुरुस्त करणेबाबत मागणी माझ्याकडे आली होती. यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यातील अवसरी क्र.१ (दत्तात्रय जाधव फार्म) ३५.८३ लक्ष, अवसरी क्र.२ (सुभाष शिंदे फार्म) ३६.६६ लक्ष, गलांडवाडी नं.२ (गोराटे शेत) २३.३७ लक्ष, सरडेवाडी (सिड फार्म)२२.६५ लक्ष, निंबोडी क्र.१ (भाऊ कांबळे विहीर) २२.९२ लक्ष, निंबोडी क्र. २ (चांगदेवजगदाळे मळा) २२.२७ लक्ष, निंबोडी क्र.३ (हनुमंत गमरे नाला)२५.८७ लक्ष, निंबोडी क्र.४ (स्मशानभूमी) २०.८६ लक्ष, निंबोडी क्र.५ (कुंभारडोह) ३२.८६ लक्ष, काझड क्र.१ (जयवंतवाडी रोड) २०.६८ लक्ष, काझड क्र.२ (महादेव पाटीलवस्ती) २२.१७ लक्ष, काझड क्र.३ (थोटेवस्ती) २१.५७ लक्ष, बोरी (चव्हाण वस्ती) २५.२३ लक्ष, शेटफळगडे (सुरेश लोंढे शेत) ३०.१४ लक्ष, शेटफळगडे क्र.२ (विजयसिंह पवार वस्ती) ३०.७१ लक्ष, पिंपळे क्र.१ (कवचाचा म्हसोबा) २३.४४ लक्ष, पिंपळे क्र. २ (स्मशानभूमी) २८.१८लक्ष, पिटकेश्वर (मेळ ओढा) २५.९२ लक्ष, पिटकेश्वर बंधारा क्र.१ ला २७.४८ लक्ष, पिटकेश्वर (दत्तात्रय शेंडे) २६.२४ लक्ष, निमगावकेतकी (कानोबा मळा) २२.९७ लक्ष, बाबुळगाव क्र.२ (चांभारकी चा ओढा २०.२६ लक्ष, बाबुळगाव (मगरवस्ती) २१.९६ लक्ष, अंथुर्णे (शिरसट वाडी बॉर्डर) २१.६५ लक्ष, कडबनवाडी (जंगल) २४.७५ लक्ष, निमसाखर (राहुल हुंबे मळा) २७.७१ लक्ष, खोरोची गावठाण २६.५५ लक्ष, कळंब (इंदिरानगर) २५.५९ लक्ष, पोंधवडी क्र.१ (पद्मवती मंदिर) ४२.२० लक्ष, पोंधवडी क्र.२ (खारतोडे वस्ती) २९.४९ लक्ष, पोंधवडी क्र.२ (दादा धुमाळ मळा २८.६५ लक्ष, निरगुडे (सटवाईचा मळा) ३७.२६ लक्ष, निरगुडे क्र. २ (म्हसोबा मंदिर) १९.९५ लक्ष, लाकडी (लहू पाटील वस्ती) २४.२३ लक्ष, म्हसोबावाडी (डाहळे ओढा) २८.४५ लक्ष, म्हसोबावाडी (पवारवस्ती) २१.२२ लक्ष, अकोले (म्हळई) २५.५९ लक्ष, वडापुरी (पाणीपुरवठा विहीरीजवळ) २९.८२ लक्ष, सुरवड २२.१३ लक्ष, वकीलवस्ती नं.१ (जितेंद्र घोगरे शेत) २०.८३ लक्ष, वकीलवस्ती नं.२ (ओमराव घोगरे) २०.७८ लक्ष, वकीलवस्ती नं.३ (पांढरे वस्ती) २१.२१ लक्ष, वकीलवस्ती नं.४ (काळोखे शेटे शेत) २१.५४ लक्ष, वकीलवस्ती नं. ५ (ज्ञानदेव घोगरे शेत) ३८.४० लक्ष, बावडा नं.४ (निवृत्ती घोगरे फार्म) ३६.१३ लक्ष, बावडा नं.५ (स्मशानभूमी जवळ) २३.९६ लक्ष, बावडा नं. ६ (ऋुतुराज घोगरे फार्म जवळ) १९.९३ लक्ष या नवीन बंधाच्याच्या ५० कामांस व दुरुस्तीसाठी निरगुडे (गावठाण) कोल्हापूर पद्धतीचा बंधा १६. ८३ लक्ष, निमसाखर (विटभट्टीजवळ) को. प. बंधारा दुरुस्ती १३.३० लक्ष अशा एकूण ५२ कामांसाठी एकूण १३ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती तसेच यापुढेही तालुक्यातील उर्वरित दुष्काळग्रस्त गावातील नवीन बंधाऱ्याच्या बांधकामासाठी निधी मागणीनुसार मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.