Pune Corona News: शहरात शुक्रवारी १३८ जणांची कोरोनावर मात; तर १५५ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 21:58 IST2021-10-01T21:57:53+5:302021-10-01T21:58:37+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ४१९ संशयितांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: शहरात शुक्रवारी १३८ जणांची कोरोनावर मात; तर १५५ नवे रुग्ण
पुणे : शहरात शुक्रवारी १५५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ४१९ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.८४ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ५०२ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १८५ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २२२ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३३ लाख ७६ हजार ६७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख १ हजार १८१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९० हजार ६४८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.