Pune Porsche Car Accident:'बाळा'च्या बाप अन् आजोबाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलीस कोठडीसाठी अर्ज करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 03:50 PM2024-05-31T15:50:55+5:302024-05-31T15:52:36+5:30

विशाल अग्रवालवर अजून एक गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याला अटक करण्याची शक्यता

14 day judicial custody to vishal agarwal and surendra agrawal Will another case be filed | Pune Porsche Car Accident:'बाळा'च्या बाप अन् आजोबाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलीस कोठडीसाठी अर्ज करणार

Pune Porsche Car Accident:'बाळा'च्या बाप अन् आजोबाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलीस कोठडीसाठी अर्ज करणार

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. या प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकरणे  उघडकीस येऊ लागली आहेत. विशाल अग्रवाल याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर आता पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासण्यात येत आहे. कल्याणी नगर अपघातात दररोज मोठमोठे खुलासे होत असताना, सीसीटीव्ही फुटेजमुळे अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांना मिळाली आहे. 

बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमारने चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बाळाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले. तर विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ससूनच्या धक्कादायक प्रकरणानंतर अनेक मासे गळाला लागण्यास सुरुवात झाली आहे.  सुरेंद्रकुमार अग्रवाल याचे छोटा राजनशी असलेले कनेक्शन या निमित्ताने पुन्हा समोर आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यातच दोघा बाप-बेट्यांनी त्यांच्या चालकाला डांबून ठेवून धमकी दिल्याने अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. हे तपासण्यासाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. ती आज संपल्याने पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

विशाल अग्रवाल अजून एक गुन्हा दाखल 

ससूनच्या रक्त नमुना फेरफार प्रकरणात दोन्ही डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये विशाल अग्रवालने डॉक्टरला ३ लाख दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे विशाल अजूनच अडचणीत आलाय. पोलीस या प्रकरणाच्या तापासासाठी अजून एक गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगत न्यायालयात पोलीस कोठडीसाठी अर्ज करणार आहेत.

Web Title: 14 day judicial custody to vishal agarwal and surendra agrawal Will another case be filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.