भोरच्या नवगुरुकुल इन्स्टिट्यूटमध्ये विषबाधा झालेल्या १४ मुलींना सोडले घरी; संस्थेकडून कोणतीही विचारपूस नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 08:05 PM2021-12-29T20:05:36+5:302021-12-29T20:06:03+5:30

चोवीस तास निरीक्षणाखाली ठेवून उपचारानंतर सोडले असून, ६ मुलींवर ससूनमध्ये तर ८ मुलींवर भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत

14 girls who were poisoned at Navgurukul Institute in Bhor were released at home There is no question from the organization | भोरच्या नवगुरुकुल इन्स्टिट्यूटमध्ये विषबाधा झालेल्या १४ मुलींना सोडले घरी; संस्थेकडून कोणतीही विचारपूस नाही

भोरच्या नवगुरुकुल इन्स्टिट्यूटमध्ये विषबाधा झालेल्या १४ मुलींना सोडले घरी; संस्थेकडून कोणतीही विचारपूस नाही

googlenewsNext

भोर : पुणे-सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील खोपी येथील फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या इमारतीत असलेल्या नवगुरुकुल इन्स्टिट्यूटमधील २८ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली होती. भोर उपजिल्हा रुग्णालयात २२ मुली उपचार घेत होत्या. त्यातील १४ मुलींना २४ तास निरीक्षणाखाली ठेवून उपचारानंतर सोडले असून, ६ मुलींवर ससूनमध्ये तर ८ मुलींवर भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

२८ तारखेला सायंकाळी ६ वाजता भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात २२ विद्यार्थिनी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या मुलींना मळमळ, जुलाब, उलट्या व पोटदुखीचा त्रास असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. असे डॉ. आनंद साबणे यांनी सांगितले. नवगुरुकुल संस्था आणि इन्स्टिट्यूट प्रशासनाकडून मुलींबरोबर उपचारासाठी कोणीही आलेले नाही. कॉलेजमध्ये विषबाधा होऊनही काँलेज प्रशासनाडुन दुर्लक्ष नवगुरु संस्था आणि इंस्टिट्युट या काँलेज मध्ये २८ मुलीना व दवाखान्यात न आलेल्या मुलांची काँलेज प्रशासनाकडुन कोणत्याही प्रकारची विचारपुस केली नाही. यामुळे प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त होत आहे.

रविवारी २६ तारखेला रात्री जेवण केल्यावर सोमवारी (ता.२७) सकाळी चार-पाच मुलींना पोटदुखीचा व उलट्या, तसेच जुलाबाचा त्रास सुरू झाला. मात्र, त्याकडे त्यांनी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. सोमवारी रात्रीपर्यंत अनेक विद्यार्थिनींचा त्रास अधिक वाढत गेला होता. त्यामुळे मंगळवारी २८ डिसेंबरला १०८ रुग्णवाहिकेला फोन करून त्यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये सायंकाळी ६ वाजता भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात २२ विद्यार्थिनी उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. 

Web Title: 14 girls who were poisoned at Navgurukul Institute in Bhor were released at home There is no question from the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.