सर्वेक्षणासाठीचे १४ लाख दुसऱ्याच कामासाठी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:56+5:302021-07-21T04:09:56+5:30
पुणे : पुण्यात शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या होणाऱ्या भुयारी मार्गामध्ये जमा होणाऱ्या पाण्याचे रेन वॉटर हार्वेस्टिंग ...
पुणे : पुण्यात शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या होणाऱ्या भुयारी मार्गामध्ये जमा होणाऱ्या पाण्याचे रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्वेक्षण करण्यासाठी भूजल विकास यंत्रणेला १४ लाख रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात भूजल उपसंचालकांनी सर्वेक्षण केले नाही. किंवा मेट्रोला याबद्दलचा कुठलाही अहवाल दिला नाही. सर्वेक्षणासाठी दिलेले १४ लाख रुपये भलत्याच कामासाठी खर्च केल्याचे उघडकीस आले आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे विभागाच्या उपसंचालकांना मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान होणाऱ्या भुयारी मार्गात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे संदर्भात सर्वेक्षणाचे काम दिले.त्यापोटी 14 लाख रुपये भूजल सर्वेक्षण विभागाला देण्यात आले. प्रत्यक्षात सर्वेक्षणाचे काम या यंत्राने केले नाही किंबहुना महा मेट्रोला कोणताही अहवाल दिला नाही . मेट्रो कडून आलेले 14 लाख रुपये राष्ट्रीय पेयजल विभागाच्या खात्यात जमा केले वास्तविक यासाठी स्वतंत्र नव्याने खाते काढणे आवश्यक होते. यासंदर्भात शासनाकडून सूचना आल्यानंतर त्याचे स्वतंत्र खाते तयार करण्यात आले.
मेट्रो कडून सर्वेक्षणासाठी मिळालेल्या 14 लाखांचा निधी काम न झाल्याने हा निधी पुन्हा शासनाकडे किंवा मेट्रो कडे जमा करणे आवश्यक होते.परंतु या पैशातून भूजल भवन इमारतीचे वीजबील तसेच स्टेशनरी आणि अन्य कामासाठी खर्च खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.