Pune Crime : मांजरीत घरफाेडी करीत १४ लाखांच्या ऐवजाची चाेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 10:47 IST2022-11-07T10:46:35+5:302022-11-07T10:47:42+5:30
पुणे-साेलापूर रस्त्यावर मांजरी ग्रीन ॲनेक्स साेसायटीतील घटना...

Pune Crime : मांजरीत घरफाेडी करीत १४ लाखांच्या ऐवजाची चाेरी
पुणे : मांजरी परिसरात कुलूपबंद सदनिका फाेडून चाेरट्यांनी घरातील साहित्य,राेख रक्कम आणि साेन्याचे दागिने असा एकूण १३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चाेरून नेला. पुणे-साेलापूर रस्त्यावर मांजरी ग्रीन ॲनेक्स साेसायटीत शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तीन अज्ञात चाेरट्यांविराेधात हडपसर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी या सदनिकेस कुलूप लावून बाहेरगावी गेल्या हाेत्या. तीन चाेरट्यांनी बंद सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला आणि घरातील साहित्य,राेख रक्कम आणि साेन्याचे दागिने असा मुद्देमाल चाेरून नेला. उपनिरीक्षक अविनाश शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.