ओतूर परिसरात १४ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:28+5:302021-05-31T04:09:28+5:30
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत १९ गावे आहेत. त्यापैकी रविवारी फक्त ६ गावांत एकूण १४ नवीन रुग्ण सापडले आहेत. ...
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत १९ गावे आहेत. त्यापैकी रविवारी फक्त ६ गावांत एकूण १४ नवीन रुग्ण सापडले आहेत. यात ओतूर शहरातील ७, धोलवड ३, डिंगोरे, बल्लाळवाडी, नेतवड माळवाडी, रोहोकडी प्रत्येक गावात एक एक असे १४ रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे परिसराची बाधितांची संख्या २ हजार २८३ झाली आहे. २ हजार ४८ बरे झाले आहेत. १०७ कोविड सेंटर तर ३५ जण घरीच उपचार घेत आहेत. ९२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
ओतूर शहरात शनिवारी ४, रविवारी ६ अशी रुग्णसंख्या आहे. ओतूर परिसरातील बाधितांची संख्या ९९५ झाली आहे. ८९८ बरे झाले आहेत. ३७ कोविड सेंटर २२ जण घरीच उपचार घेत आहेत. ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.