शहरातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Published: April 21, 2017 06:11 AM2017-04-21T06:11:05+5:302017-04-21T06:11:05+5:30

पोलीस महासंचालकांनी राज्यातील २६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गुरुवारी केल्या़ त्यात पुण्यातील १४ जणांचा समावेश आहे़ तसेच अन्य ठिकाणाहून ७ जणांची पुण्यात बदली केली़

14 police inspectors transferred in the city | शहरातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

शहरातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Next

पुणे : पोलीस महासंचालकांनी राज्यातील २६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गुरुवारी केल्या़ त्यात पुण्यातील १४ जणांचा समावेश आहे़ तसेच अन्य ठिकाणाहून ७ जणांची पुण्यात बदली केली़
पुण्यातून बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे (बदलीचे ठिकाण) : श्रीकांत नवले (औरंगाबाद शहर), शिवाजी शिंदे (सोलापूर ग्रामीण), भरतकुमार मुदीराज (नाशिक शहर), सुनील पाटील (कोल्हापूर), स्मिता जाधव (नवी मुंबई), रेहाना शेख (मुंबई शहर), सुनील पवार (अहमदनगर), सचिन सावंत (सोलापूर शहर), सुनील पंधरकर (ठाणे शहर), वर्षाराणी पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), मनोज खंडाळे (लोहमार्ग पुणे), संजय तुंगार (पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा)़ पुणे ग्रामीण पोलीस दलातील संजय गोर्ले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) तसेच लोहमार्ग पुणेतील रमेश भिंगारदिवे (सांगली) यांच्या बदल्या झाल्या आहेत़ ७ पोलीस निरीक्षकांच्या, गुन्हे अन्वेषण विभागातील ५ जणांच्या बदल्या पुण्यात करण्यात आल्या आहेत़ प्रभाकर शिंदे, अप्पासाहेब शेवाळे, गजानन पवार यांची पुणे शहर पोलीस दलात बदली झाली आहे़ तर, फेईमिदा बकाईत व सतीश नांदूरकर यांची अनुसूचित जात पडताळणी विभागात व शिल्पा चव्हाण यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील गणेश जवादवाड यांची कारागृह, पुणे येथे व पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथील अतुलकुमार नवगिरे यांची शहरात बदली झाली़

Web Title: 14 police inspectors transferred in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.