पुण्यातील १४ प्रकल्पांचा झाला प्रारंभ

By admin | Published: June 26, 2016 04:50 AM2016-06-26T04:50:49+5:302016-06-26T04:50:49+5:30

शहरामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या १४ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने बटन दाबून शुभारंभ करण्यात आला.

14 projects in Pune begin | पुण्यातील १४ प्रकल्पांचा झाला प्रारंभ

पुण्यातील १४ प्रकल्पांचा झाला प्रारंभ

Next

पुणे : शहरामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या १४ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने बटन दाबून शुभारंभ करण्यात आला. यामध्ये शाश्वत रोजगार निर्मिती, झोपडपडपटट्ी पुर्नवसन, पीएमपी अ‍ॅप, मी कार्ड अशा प्रकल्पांचा समावेश आहे.
औंध-बाणेर-बालेवाडी मॉडेल एरियातील प्रोजेक्ट : शाश्वत रोजगार निर्मिती केंद्र : तरूणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी वॉर्डस्तरावर लाइट हाऊस उभारले जाणार आहेत. प्रायोगित तत्त्वावर औंध क्षेत्रिय कार्यालयात लाइट हाऊस उभारण्यात आले असून त्यानंतर इतर वॉर्डांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे.
बाबासाहेब आंबडेकर वसाहतीचे पुर्नवसन : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील कुटुंबियांचे ‘सर्वांसाठी घर’ या योजनेअंतर्गत पुर्नवसन केले जाणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी सभागृह, अंगणवाडी यासह विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
पादचारी मार्गाचा विकास : नागरिकांच्या सर्वकष सहज संचारासाठी पादचारी मार्ग व सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट औंध-बाणेरमध्ये राबविला जाणार आहे.
पीएमपी संबंधित प्रकल्प
नियंत्रण कक्ष : सुरक्षित व सुनिश्चित सार्वजनिक वाहतुकीसाठी एक सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पीएमपीचे व्यवस्थापन या कक्षामार्फत पाहिले जाणार आहे.
वाहनांची सुयोग्य देखभाल : पीएमपीसह सार्वजनिक वाहनांची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहने रस्त्यांमध्येच बंद पडून होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासापासून यामुळे सुटका होऊ शकणार आहे.
मोबाइल अ‍ॅप : पीएमपी बसचे वेळापत्रक, बस स्टॉपवर कधी येणार, बसची सध्याची स्थिती आदीची माहिती नागरिकांना मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मी कार्ड : पीएमपी बसच्या प्रवाशांना मोबिलीटी कार्डच्या माध्यमातून तिकिट, पासचे पैसे देता येणार आहेत.

सौरऊर्जा प्रकल्प : सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी महापालिकेकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. नागरिकांनी सौरऊर्जेतून वीजेची गरज भागवावी व उर्वरित वीज शासनाला विकावी असे नियोजन आहे.
प्लास्टिक वॉटल रिसायकलींग प्रकल्प : शहरातील प्लास्टिक कचऱ्यांची समस्या सोडण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये प्लास्टिक वॉटल रिसायकींग प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याची शास्त्रीय पध्दतीने पुर्नवापर करण्यात येणार आहे.
मुव्ह ट्रॅकिंग सिस्टिम : शहरतील सर्व कचरा गाडयांना जीपीएस बसविण्यात आले आहे. शहराची स्वच्छता चांगल्याप्रकारे राखण्यासाठी या मुव्ह ट्रॅकिंग सिस्टिमची मदत होणार आहे.
ट्रफिक डिमांड कंट्रोल : शहरातील वाहतुकीनुसार सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या ट्रफिक डिमांड कंट्रोलची व्यवस्था कार्यान्वित करण्यात येत आहे.


क्वाटिंफाइड सिटीज मुव्हमेंट
शहराच्या विकासामध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा याकरिता क्वाटिफाइड सिटीज मुव्हमेंट हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
१०० टक्के तक्रार निवारण प्रणाली
पीएमसी केअर अंतर्गत पाणी पुरवठयासंबंधी तक्रार निवारणाकरिता कक्ष उभारण्यात आला आहे. पाणी पुरवठयाच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात येणार आहेत.

Web Title: 14 projects in Pune begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.